
Ravan Temples In India:
Sakal
भारतामध्ये काही ठिकाणी रावणाची पूजा केली जाते, जिथे त्याला भगवान शिवाचा भक्त आणि विद्वान मानले जाते. या ठिकाणी रावणाची मंदिरे आहेत, जिथे त्याची पूजा केली जाते. या लेखात अशा पाच मंदिरांची माहिती दिली आहे जिथे रावणाची विशेष पूजा होते.
Ravan Temples In India: धार्मिक मान्यतेनुसार लंकेचा राजा रावणने भगवान रामाच्या पत्नीचे म्हणजेच सीतेचे अपहरण केले होते. त्यानंतर सीतेला परत आणण्यासाठी रामआणि रावणमध्ये युद्ध झाले. यात रावणाचा पराभव झाला. परंतु भारतातील काही भागात लोक रावणाला राक्षक म्हणून पाहत नाहीत तर तो एक विद्वान भगवान शिवाचा भक्त म्हणून पाहतात. देशातील अनेक लोक दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करतात. परंतु भारतात काही ठिकणे असे आहेत जिथे रावणाचे मंदिर आहेत आणि तिथे पूजा देखील केली जाते. आज अशाच पाच मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत.