यंदाच्या हंगामातील जंगल सफारी सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामात दीड हजारांवर पर्यटकांनी जंगल सफर केली आहे.
कोल्हापूर : सह्याद्रीचे निसर्गरम्य रूप, घनदाट जंगल, पठार, त्यातील वन्यजीवांचा मुक्त वावर अनुभण्यासाठी चांदोली जंगल सफर करण्याची संधी वन्यजीव विभागाने दिली आहे. यंदाच्या हंगामासाठी नुकतीच चांदोली अभयारण्य (Chandoli Sanctuary) सफर सुरू झाली असून, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पर्यटकांना जंगल अनुभवण्यासाठी ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे जंगल पर्यटनाचा (Tourism) आनंद घेण्याची संधी आबालवृद्धांना आली आहे.