
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. दरवर्षा लाखो भाविक या वारीची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा १९ जून पासून आषाढी वारीला सुरूवात होणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी देहू वरून 18 जून रोजी निघणार असून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी वरून 19 जून रोजी निघणार आहे. तसेच 6 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. तुम्ही यंदा देहु-आळंदीला येण्याचा विचार करत असाल तर पुढील काही धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता. या परिसरातील जवळची धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. ही स्थळे केवळ धार्मिक महत्त्वाचीच नाहीत, तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशानेही समृद्ध आहेत. वारीच्या पवित्र प्रवासात या ठिकाणांना भेट देऊन तुमचा अनुभव अधिक समृद्ध करु शकता. या ठिकाणांची शांतता, सुंदरता आणि आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला अविस्मरणीय क्षण देईल.