

Free Entry at Taj Mahal & ASI Monuments on Nov 19: Check Rules
esakal
ASI Monuments Free Entry on November 19: जर तुम्ही ताजमहालचे सौंदर्य जवळून पाहण्याचा किंवा दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. १९ नोव्हेंबरला देशातील सर्वच प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूंमध्ये प्रवेश करण्यासाठी पर्यटकांना कोणतेही तिकीट खरेदी करण्याची गरज भासणार नाही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) जागतिक वारसा सप्ताहाच्या (World Heritage Week) पहिल्या दिवशी पर्यटकांसाठी ही खास सोय उपलब्ध करून दिली आहे.
या निर्णयांतर्गत भारतीय नागरिकांसोबतच परदेशी पर्यटकांनाही केंद्रीय संरक्षित स्मारकांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. दरवर्षी १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान देशभरात जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो. देशाचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, पुरातन वास्तू आणि संस्कृतीचे जतन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.