esakal | लाॅकडाउनला कंटाळलात, घरी त्रास होतोय? मग, महाराष्ट्रातील 'या' ठिकाणांना जरुर भेट द्या

बोलून बातमी शोधा

Tourist

लाॅकडाउनला कंटाळलात, घरी त्रास होतोय? मग, महाराष्ट्रातील 'या' ठिकाणांना जरुर भेट द्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : अरबी समुद्र व पश्चिम घाटासाठी महाराष्ट्र देशभर लोकप्रिय आहे. तसेच महाराष्ट्रात मुंबई, पुणे, लोणावळा आणि नागपूर अशी अनेक सुंदर शहरे आहेत, जी राज्याच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत. बॉलिवूडसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईला महाराष्ट्राचे 'हृदय' म्हटले जाते. त्याचबरोबर या शहराला देशाची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. तथापि, महाराष्ट्रात अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत, जी त्यांच्या सौंदर्यासाठी जगभरात लोकप्रिय आहेत. जर आपणही उन्हाळ्याच्या काळात या सौंदर्यसृष्टीला भेट देण्याचा विचार करीत असाल, तर आपण महाराष्ट्रातील 'या' शहरांना जरुर भेट द्या..

माथेरान

माथेरान हे एक हिल स्टेशन असून महाराष्ट्र राज्यात या शहराची एक वेगळी खासियत आहे. जर तुम्ही कधी पर्यटनाला जाण्याचा विचार करीत असाल, तर नक्कीच माथेरानला जा. येथे गेल्यास कमी बजेटमध्ये संपूर्ण पैसे वसूल अशी ठिकाणं इथे पहायला मिळतील. माथेरानची 30 हून अधिक लुकआउट पॉईंट्स आहेत. येथून आपल्याला सभोवतालची बरीच ठिकाणंही दिसू शकतात.

खंडाळा

हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये आपण खंडाळ्याचे नाव बऱ्याचदा ऐकला असाल. हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. लोणावळ्यापासून याचे अंतर अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. हे हिल स्टेशन सह्याद्रीच्या टेकडीवर असून आपण येथे हायकिंगचा आनंद घेऊ शकता. मात्र, यासाठी आपल्याला Duke’s Nose स्पॉटवर जावं लागेल.

काय सांगता! फोटोग्राफरच्या बंगल्यात राहतात Canon, Nikon, Epson; वाचा 'क्लिक'ची भन्नाट स्टोरी

गुहागर

गुहागर हे ठिकाण रत्नागिरीत असून इथली निसर्गसंपदा नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असते. गुहागर बीचबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. रत्नागिरीतला 'हापूस' आंबा जगभरात खूपच प्रसिद्ध असून हिंदीत त्याला 'हापस' असेही म्हणतात. गुहागरमध्ये फार कमी लोक पर्यटनासाठी येत असतात. मात्र, उन्हाळ्यात इथलं वातावरण पर्यटनाच्यादृष्टीने खूपच अल्हाददायक असतं.

राजमाची

राजमाची हा एक किल्ला असून तो लोणावळ्यामध्ये आहे. येथून आपल्याला सह्याद्री सीमा आणि शिरोटा फॉल्स दिसू शकतात. राजमाची येथे ट्रेकिंग करणे अत्यंत सोपे असून किल्ल्याच्या शिखरावर जाण्यासाठी फक्त 40 मिनिटांचा कालावधी लागतो. या मार्गात दोन गुफा देखील येतात.