Travel : विकेंडसाठी परफेक्ट डेस्टीनेशन आहेत महाराष्ट्रातली 'ही' ठिकाणे

महाराष्ट्रात अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत, जी त्यांच्या सौंदर्यासाठी जगभर ओळखली जातात.
Tourist plan
Tourist plan

कोकणकडे आणि सह्याद्रीने समृद्ध असलेला आपला महाराष्ट्र पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. संस्कृती आणि परंपरेसाठी महाराष्ट्र देशभर लोकप्रिय आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, लोणावळा, नागपूर अशी अनेक शहरे आहेत जी राज्याच्या सौंदर्यात भर घालतात. महाराष्ट्रात अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत, जी त्यांच्या सौंदर्यासाठी जगभर ओळखली जातात. त्यामुळे तुम्हालाही येणाऱ्या विकेंडसाठी परफेक्ट डेस्टीनेशन शोधत असाल तर महाराष्ट्रातील ५ ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.. (Tourist plan for maharashtra)

लोणावळा

हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. लोणावळा हे तलाव, धबधबे आणि डोंगरकड्यांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे पर्यटक आणि ट्रेकर्स गर्दी करतात. लोणावळा आणि मुंबई जवळ वसलेले आहे. लोणावळा सह्याद्रीच्या डोंगररांगांचा एक भाग आहे. जर तुम्ही लोणावळ्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर वाटेत खंडाळ्याला नक्की भेट द्या.

Tourist plan
Tourism : मनालीचा प्लॅन करताय? दिल्लीहून पोहोचण्यासाठी जाणून घ्या सर्वात स्वस्त मार्ग

लवासा

या ठिकाणी तूम्हाला इटालियन शहराच्या संस्कृतीचा अनुभव येईल. हे शहर इटालियन शहर पोर्टोफिनोवर आधारित आहे. लवासा हे भारतातील लेटेस्ट हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. तुम्हाला निसर्ग सौंदर्यासोबतच पायाभूत सुविधाही मिळतील. लवासा हे ७ टेकड्यांवर 25000 एकर क्षेत्रात विस्तारलेले आहे.

पाचगणी

पाचगणी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख हिल स्टेशन आहे. ब्रिटीश काळात ही जागा रिसॉर्ट म्हणून वापरली जात होती. हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. सह्याद्री पर्वताच्या पाच टेकड्यांमुळे महाराष्ट्रातील या पर्यटन स्थळाला पाचगणी असे नाव पडले आहे. पर्वतरांगावरून आपण निसर्गाचा सुंदर अनुभव घेवू शकता. पाचगणीमध्ये नेहमीच थंडी असते त्यामुळे तिथे जाताना बॅगेत गरम कपडे ठेवायला विसरू नका.

पुणे

पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर शहर म्हणून पुण्याला ओळखले जाते. पुणे महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आणि प्रमुख पर्यटन स्थळ आहे. पुणे शहराला विद्येचे माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. ज्यामुळे अनेक पर्यटक विकएन्डला पुण्याला फिरायला जाण्याचा बेत आखतात. पुणे शहर मुंबई शहरापासून जवळ असल्याने शनिवार आणि रविवार पुण्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यास काहीच हरकत नाही. पुणे शहर हे ऐतिहासिक किल्ले, पिकनिक स्पॉट्स आणि धबधब्यांसाठी खूप लोकप्रिय आहे.

Tourist plan
Travel Diary : भारतातील प्रसिद्ध ठिकाणे जिथे केला जातो जादुटोना; कधी गेलात तर सांभाळून रहा!

ताडोबा राष्ट्रीय उद्यान

ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. विकेंडला हे ठिकाण वन्यजीव आणि निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. या परिसरात दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजाती आढळतात. येथील राष्ट्रीय उद्यान हे संरक्षित व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. तुम्हाला वाघांच्या अनेक प्रजाती पाहायच्या असतील तर ताडोबा राष्ट्रीय उद्यानाला नक्की भेट द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com