Best Tips For Wildlife Travel : जंगल सफारी करताना वाघाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wildlife Travel

Best Tips For Wildlife Travel : जंगल सफारी करताना वाघाला...

जगात अनेक लोक धाडसी काहीतरी करण्याचे शौकीन असतात. त्यात स्कीइंग पॅराग्लायडिंग, ट्रेकिंगसोबत जंगल सफारी करणारेही लोक आहेत.हिवाळ्यात बोचरी थंडी सहन करत घनदाट जंगलात प्राणी पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. त्या जंगलात घालवलेल्या दिवसाची आठवण आयुष्यभर राहतो.avoid these mistakes during Wildlife Travel

आजवर केवळ टीव्ही अन पुस्तकात पाहिलेले जंगली प्राणी प्रत्यक्षात पाहणे त्यांचे फोटो काढणे हे लहान मुलांसाठी अद्भूत आनंद देणारे असते.पण, जंगलात जाताना तिथे वावरताना काळजी घेणेही आवश्यक आहे. जंगलात सोबत गाईड असला तरी काही लोक स्वत:च्या चुकीने संकट ओढाऊन घेतात. त्यामूळे जंगल सफारी करताना काय काळजी घ्यावी हे एकदा पहा आणि मगच जंगलाची वाट धरा.

जास्त भडक कपडे घालू नका

जंगल सफारीला जायचे असेल तर तुमचे कपडे आधी पाहिले जातात. कारण, नियमांनुसार सफारीदरम्यान प्रवाशांनी पर्यावरणाला मॅच होतील असे कपडे घालणे गरजेचे आहे. हिरवे, तपकिरी, शेवाळी रंगांचे कपडे परिधान करणे गरजेचे आहे. त्यामूळे जंगलात जाताना जास्त भडक रंगाचे कपडे घालू नका. असे आढळल्यास वन अधिकारी तूम्हाला जंगलात जाण्यापासून रोखू शकतात.

जंगल सफारीची गाडी

जंगल सफारी दरम्यान तुम्ही तुमचे खाजगी वाहन घेऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला नॅशनल पार्कमधीलच वाहन दिले जाते. याशिवाय सफारीदरम्यान कोणालाही गाडीतून उतरण्याची परवानगी नाही. सफारीच्यावेळी खुल्या वाहनांचा वापर केला जातो. त्यामूळे काही लोक फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीसाठी परवानगी न घेता वाहनातून खाली उतरतात. आणि संकटात सापडतात. त्या गाडीतून परवानगी न घेता खाली उतरू नये.

कॅमेरा सोबत नेताना

जंगल सफारीला जाताना लोक कॅमेरे घेऊनच बाहेर पडतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीसाठी कॅमेरा वापराल तेव्हा त्याचा फ्लॅश बंद ठेवा. कारण जंगलात फ्लॅश लाईट वापरण्याची परवानगी नाही. यामूळे प्राण्यांना त्रास होऊ शकतो.

जंगलात शस्त्रे नेऊ नका

जंगलात जाताना शस्त्रे बाळगण्यास सक्त मनाई आहे. काही लोक सुरक्षेसाठी जंगलात शस्त्रे नेतात. पण ते चुकीचे आहे. जंगल सफारी दरम्यान कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगू नये, असे केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो.

आयडी प्रूफ सोबत ठेवा

जंगल सफारीला जाण्यापूर्वी आयडी प्रूफ बाळगणे आवश्यक आहे. केवळ जंगल सफारीच नव्हे तर कोणत्याही ठिकाणी फिरायला गेल्यानंतर आयडी प्रूफ सोबत असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे ओळखपत्र नसेल तर तुम्हाला सफारीला जाण्यापासून रोखले जाऊ शकते.