
Trek to Ajoba Hills: निसर्गाचा सुंदर नजारा म्हणजे लव-कुशचे जन्मस्थान; आजही आहेत त्यांचे पाळणे
Tourist Places: महाराष्ट्रात अनेक गड किल्ले आणि पर्वत आहेत आणि त्यांच वेगळ महत्वही. काहींना पौराणिक तर काहींना ऐतिहासिक बाजू आहे. त्यामुळे अनेक गड प्रेमी ट्रेकिंग साठी नवनवीन जागांच्या शोधात असतात. हिवाळा हा कोणत्याही ट्रेकिंग साठी पूरक असा ऋतू मानला जातो. सर्वत्र खूप हिरवळ असते आणि निसर्गाच एक सुंदर रूप आपल्याला बघायला मिळत.
अशीच एक जागा म्हणजे अजोबा हिल्स. अजोबा नाव असण्याच कारण लव कुश हे वाल्मिकी ऋषींच्या सानिध्यात मोठे झाले त्यांच्यासाठी वाल्मिकी हे आजोबांसारखे होते, आणि त्यांची जागा म्हणून या पर्वताला आजा पर्वत किंवा अजोबा हिल्स म्हणतात.

अजोबा हिल्स किंवा आजा पर्वत हा समुद्र सपाटीहून 4511 फुट उंचावर, सह्याद्रीच्या पश्चिम घाटावर देहेणे गावाजवळ आहे. गंमत म्हणजे इतिहासकारांच्या मते, या पर्वतावरती सीता माईने लव आणि कुशाचे पालनपोषण केले होते.
प्रभू रामचंद्रांनी सीता माईला सोडल्यानंतर त्या इथे येऊन राहिल्या होत्या, इथे जवळच वाल्मिकी ऋषींच आश्रम आहे, या डोंगरावर सीता माईची गुंफा आणि लव कुशांचा पाळणा बांधल्याची जागा आहे. इथे त्या दोघांच्या पायाचे ठसेही सापडतात. (Travel Blog)
ट्रेकिंग साठी अनेक लोक इथे येत असतात, शिवाय या पर्वताच्या आजूबाजूला धबधबा आणि जंगल असल्याने फोटो काढण्यासाठीही हे खूप सुंदर ठिकाण आहे. इथे अनेक प्रकारचे विषारी साप आणि विंचू सापडतात त्यामुळे नागरिकांनी जरा जपून जावे असा इशाराही वन खात्याने दिलेला आहे. पर्वताच्या माथ्यावरती बघण्यासारख असं काही नाही त्यामुळे अनेक लोक लव कुशाचा पाळणा बघून मागे फिरतात.
हेही वाचा: Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?
तुमच्या पूर्ण कुटुंबांसोबत किंवा मित्र मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी ही एक उत्तम ट्रेकिंगची जागा आहे. तुम्ही इथे छान डबा पार्टीही करू शकतात. तुम्ही मुंबईहून देहाने गावासाठी लोकल ट्रेन पकडून किंवा आसनगावावरून प्रायव्हेट रिक्षा किंवा बसने इकडे येऊ शकतात, साधारण पूर्ण पर्वत चढायला तुम्हाला अडीच ते तीन तास लागू शकतात.