कोरोनाची लाट ओसरताच लोक निघाले पर्यटनाला; 'हे' राज्य अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tourism industry

लोक सतत घरात राहून कंटाळले आहेत. आता त्यांना काही दिवस फिरण्याचा आनंद घ्यायचा आहे.

कोरोनाची लाट ओसरताच लोक निघाले पर्यटनाला; 'हे' राज्य अव्वल

जगभरातील कोरोना व्हायरसची परिस्थिती सुधारल्यानंतर पर्यटन उद्योगाने पुन्हा भरभराटीला सुरुवात केली आहे. भारतातही पर्यटन उद्योगाला गती मिळू लागली आहे.

थॉमस कूक इंडियाच्या मते, कोरोना नंतरच्या परिस्थितीत कर्नाटकातील लोक जास्तीत जास्त संख्येने बाहेर फिरायला जात आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, देशात सर्वाधिक हॉलिडे बिजनेस कर्नाटकातूनच मिळत आहे. लोक सतत घरात राहून कंटाळले आहेत आणि आता त्यांना काही दिवस फिरण्याचा आनंद घ्यायचा आहे.

हेही वाचा: पर्यटन स्थळावरील गर्दी थांबविण्यासाठी कंट्रोल ट्युरिझमची आवश्‍यकता

कंपनीच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसमुळे गेल्या 18 महिन्यांपासून लोक कठोर निर्बंध आणि लॉकडाऊनसारख्या परिस्थितीशी झुंजत होते. आता लसीकरण आणि उपचारांच्या वाढत्या सुविधांमुळे देशाची स्थिती सुधारली आहे. त्यामुळे बाहेरगावी जाऊन प्रवास करण्याची लोकांमध्ये प्रचंड इच्छा निर्माण झाली होती. जे लोक आता पर्यटनाच्या माध्यमातून पूर्ण करत आहेत.

हेही वाचा: 'ही' आहेत जगातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळं; एकदा जरुर भेट द्या

कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्याला देशभरातून येणारे सण आणि हिवाळी हंगामासाठी बुकिंग साठी क्वेरी येत आहेत. त्याचा व्यवसायही हळूहळू पूर्वीच्या पातळीवर सरकत आहे. यामध्ये बंगळुरू शहर आघाडीवर आहे. पर्यटन व्यवसायाची सर्वात जलद पुनर्प्राप्ती देखील येथून (बेंगळुरू) होत आहे. तेथे कंपनीचा व्यवसाय कोरोनापूर्व स्थितीच्या ५५ ​​टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा अर्थ तेथील लोक सर्वात जास्त बाहेर फिरायला जाताहेत.

लेजर ट्रॅव्हलचे उपाध्यक्ष संतोष कन्ना यांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती सुधारल्यानंतर बाहेर पडणाऱ्यांमध्ये बंगळुरूचे लोक जास्त आहेत. त्यांच्या एकूण बुकिंगपैकी ७२ टक्के बुकिंग बेंगळुरूमधून होत आहेत. तेथील लोकांना नवीन ठिकाणी जाऊन हँग आउट करायचे आहे. त्यांना कोरोनानंतरच्या परिस्थितीचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे.

संतोष कन्ना यांच्या मते, कमी बजेटमध्ये भारतातील विविध ठिकाणी फिरणे ही कर्नाटकातील लोकांची पहिली पसंती आहे. याशिवाय अनेक लोक मालदीव, तुर्की, युरोप आणि दुबई येथे प्रवासासाठी बुकिंग करत आहेत. बाहेरगावी जाणाऱ्यांमध्ये कौटुंबिक व्यक्ती, जोडपे आणि नोकरदार लोकांसह अनेकांचा समावेश आहे.

loading image
go to top