Char Dham Yatra : चार धाम यात्रेला जाताय? तिथल्या या गोष्टींबद्द्ल तुम्हाला ही माहिती असायलाच हवी!

हिंदू धर्मात चार धाम यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे
Char Dham Yatra
Char Dham Yatra esakal

Char Dham Yatra :

अक्षय तृतीयेच्या दिवसापासून चार धाम यात्रेला सुरूवात झाली आहे. अनेक दिवस बंद असलेल्या मंदिरांचे दरवाजे उघडले गेले आहेत. त्यामुळे, चार धाम यात्रेला जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे.  

चार धाममध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या मंदिंरांना भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. इथल्या पावन भूमीत पाय ठेऊन भगवंतांचे दर्शन घेणे आणि परतीच्या प्रवासाला लागणे हा भक्तांचा मानस आहे.

Char Dham Yatra
Konkan Tourism : कोकणातील स्वप्नवत गाव 'अणसुरे'; गावात काय आहे खास?

हिंदू धर्मात चार धाम यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीने एकदातरी ही यात्रा करावी असे म्हटले जाते. चार धाम यात्रा केल्यास आपल्या पापांचा मोक्ष होतो असे सांगितले जाते. 

यंदा तुम्हीही यात्रेला जाण्याचा विचार करत असाल तर, काही गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. कारण, या चारही धामांकडे जाणारे रस्ते अतिशय धोकादायक आहेत. त्यामुळेच आज आपण काही गोष्टींची माहिती घेऊयात. (Char Dham Yatra)

Char Dham Yatra
IND Squad For SA Tour : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाने बदलला कर्णधार? 'या' खेळाडूकडे दिली संघाची धुरा

हरिद्वारमधून होते सुरूवात

हरिद्वार येथून गंगा स्नान करून चारधाम यात्रा सुरू होते. जे प्रवासी अवघड ट्रेक करू शकत नाहीत त्यांनी बद्रीनाथ आणि गंगोत्रीला भेट द्यावी. कारण तिथे पोहोचणे सोपे आहे. जर तुम्ही चारही धामांना भेट देणार असाल तर ते पूर्ण करण्यासाठी एकूण 10 ते 12 दिवस लागतात. त्यामुळे चार धाम यात्रेत तुमच्यासोबत नेण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींची यादी आधीच तयार करा.

Char Dham Yatra
Offbeat Tour : स्वतःच्या कारने फिरण्याचा भारतातला ऑफबीट ट्रेंड!

कोणत्या मंदिरांपर्यंत पोहोचणे आहे कठीण

चार धाम यात्रेला जाणाऱ्या लोकांना हे माहित असले पाहिजे की ते फक्त दोन मंदिरांपर्यंत सहज पोहोचू शकतात. यामध्ये बद्रीनाथ आणि गंगोत्रीचा समावेश आहे. इतर दोन मंदिरांकडे जाणारी वाट खूपच अवघड आहे. ज्यामध्ये केदारनाथ सर्वात कठीण आहे.

केदारनाथमध्ये आतापर्यंत सर्वाधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घ्या. तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी नसल्यास प्रवासाला जाणे टाळावे. कारण पहिल्यांदाच केदारनाथला जाणाऱ्या प्रवाशांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

Char Dham Yatra
Spanish Woman : world Tour करणाऱ्या तरूणीसोबत Jharkhand मध्ये नेमकं काय घडलं?

चार धाम यात्रेतील सर्वात उंच ठिकाण कोणतं?

चार धाममध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री यांचा समावेश होतो. यापैकी गंगोत्री समुद्रसपाटीपासून 11,204 फूट, बद्रीनाथ समुद्रसपाटीपासून 10,170 फूट, यमुनोत्री  10,804 तर केदारनाथ समुद्रसपाटीपासून वर - 11,755 फूट इतके उंच आहे.

बर्फवृष्टीमुळे या चार धामांमध्ये थंडी कायम असते. असे बरेच प्रवासी आहेत जे चार धामला भेट दिल्यानंतर 13,200 फूट उंचीवर असलेल्या गोमुखलाही भेट देतात. तथापि, येथे जाणे इतके सोपे नाही. हे गोमूख 13,200 फूट उंचीवर वसलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com