Savatkada Waterfall : दारु पिवून धबधबा पहायला जात असाल, तर ही बातमी आधी वाचा; अन्यथा मिळू शकते 'ही' शिक्षा!

सवतकडा धबधबा बनला पर्यटकांच्या गळ्यातील ताईत
Savatkada Waterfall
Savatkada Waterfallesakal
Summary

धबधब्याच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून त्या ठिकाणी बिनदिक्कतपणे मद्यपान केले जात असल्याचे चित्रही दिसत आहे.

राजापूर : तालुक्यातील चुनाकळवण येथील सवतकडा धबधबा (Savatkada Waterfall) गेल्या काही वर्षामध्ये पर्यटकांच्या (Tourists) गळ्यातील ताईत बनला आहे. या ठिकाणी बिनधास्तपणे मद्यपान करत वातावरण बिघडवणाऱ्या पर्यटकांना गावातील चुनाकोळवण अंबिकेश्‍वर प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि जागरूक ग्रामस्थांनी चांगलाच धडा दिला आहे.

Savatkada Waterfall
Almatti Dam : 'आलमट्टी'तून फक्त 15 हजार क्युसेक विसर्ग; महाराष्ट्राला मोठा फटका, जाणून घ्या कारण

वातावरण बिघडवणाऱ्या परजिल्ह्यातील मद्यपींना सज्जड दम देताना संबंधितांकडून त्या परिसराची स्वच्छताही करून घेतली. मुंबई-गोवा महामार्गावरून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधबा गेल्या काही वर्षामध्ये चांगलाच चर्चेत आला आहे.

या धबधब्याच्या ठिकाणी स्थानिक लोकांसह पुणे, कोल्हापूर, मुंबई, सांगली आदी परिसरातीलही हौशी पर्यटक मोठ्या संख्येने येऊन निसर्गाच्या सान्निध्यात आनंद लुटत आहेत. पर्यटकांच्या संख्येमध्ये दरवर्षी अधिकच वाढ होत चालली आहे; मात्र, निसर्ग परिसर आणि लोकवस्तीपासून काहीशा दूर असलेल्या या धबधब्याच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून त्या ठिकाणी बिनदिक्कतपणे मद्यपान केले जात असल्याचे चित्रही दिसत आहे.

Savatkada Waterfall
Ratnagiri Rain : रत्नागिरीत पावसाने उडवली दाणादाण! चिपळूण, खेड, राजापुरात पूरस्थिती; आजही Red Alert

त्याचा त्रास त्या ठिकाणी कुटुंबीयांसमवेत आलेल्या महिला, तरुणी, लहान मुलांना होतो. त्याच्यातून त्या ठिकाणचे वातावरणही बिघडते. काही दिवसांपासून धबधबा परिसरामध्ये मद्यपान करून वातावरण बिघडवणाऱ्या पर्यटकांना चुनाकोळवण येथील श्री अंबिकेश्‍वर प्रतिष्ठानच्या (Ambikeshwar Pratishthan) पदाधिकाऱ्यांनी चांगलाच धडा दिला.

Savatkada Waterfall
Kolhapur Rain : राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद; महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या पंचगंगेची काय स्थिती?

गावातील काही जागरूक नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्यासह गावप्रमुख मधुकर मठकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुभाष गुरव, अनिल गुरव, गणेश गुरव, प्रदीप भेरे आदींनी वातावरण बिघडवणाऱ्या मद्यपींना दम देताना संबंधितांकडून त्या परिसराची स्वच्छताही करून घेतली.

भविष्यामध्ये अशाप्रकारे वातावरण बिघडवणार्‍यांना चांगलाच धडा देण्याचा इशाराही या वेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दिला. दरम्यान, उत्साही आणि मद्यपी पर्यटकांना प्रतिबंध करण्याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याचे निवेदन प्रतिष्ठानच्यावतीने स्थानिक ग्रामपंचायतीसह प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना दिले आहे.

Savatkada Waterfall
डॉ. आंबेडकर कमान वाद : अॅट्रॉसिटी कशी काय दाखल होऊ शकते? बेडगकरांची बाजू ऐकण्यासाठी समिती स्थापन

ग्रामपंचायतीकडून माहितीचे फलक

कोकणात तीव्र उताराचा भाग असल्याने पाऊस पडल्यानंतर काही मिनिटांमध्ये पाणी वाहत येते. याबाबत स्थानिक लोकांना माहिती असते. अन्य भागातून येणार्‍या पर्यटकांना फारशी माहिती नसते. चार वर्षापूर्वी मुसळधार पावसामध्ये अचानक वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे धबधब्याच्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी आलेले पर्यटक वाहून जातात.

सुदैवाने आतापर्यंत जीवितहाना झालेली नाही. त्यामुळे सवतकडा धबधब्याच्या येथील भौगोलिक स्थितीसह पर्यटनस्थळाची माहिती आणि सुरक्षेच्यादृष्टीने योग्य ती माहिती सूचना देणारे फलक ग्रामपंचायतीने लावले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com