esakal | हज यात्रेला निघालाय? मक्का-मदिनाला जाण्यापूर्वी लसीकरण करा, अन्यथा प्रवेश नाही!

बोलून बातमी शोधा

Hajj Pilgrimage
हज यात्रेला निघालाय? मक्का-मदिनाला जाण्यापूर्वी लसीकरण करा, अन्यथा प्रवेश नाही!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना कालावधीत हजवर जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी मोठी बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, हज समिती ऑफ इंडियाने मक्का-मदिना येथे जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी कोरोना लसीकरण अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता हज यात्रेकरूंना दोन्ही कोरोना लस घेतल्यानंतरच मक्का-मदिनाला जाण्यास परवानगी मिळणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना हज कमिटी ऑफ इंडियाचे मकसूद अहमद म्हणाले, सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाच्या सूचनांचे पालन करून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हज यात्रेसाठी अर्ज करणाऱ्या प्रवाशांना स्वत: ही लस घ्यावी लागणार असून यात्रेकरूंनी याची खात्री करुन घ्यावी, की दोन्ही लस मक्का-मदिना येथे जाण्यापूर्वीच लसीकरण करुन घ्यावे.

फ्लॅट/प्लॉट घेताना कोणती काळजी घ्याल? खरेदी करताना 'या' गोष्टी तपासाच!

मागील वर्षाच्या सुरूवातीलाच सौदी अरेबिया सरकारने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी परदेशी हज यात्रेकरूंच्या प्रवेशावर बंदी घातली होती. यामुळे केवळ स्थानिक नागरिकांना हज यात्रेस परवानगी दिली होती. यावर्षी हज यात्रेची सुरुवात 17 जुलै रोजी सायंकाळी आणि संध्याकाळी 22 जुलै रोजी संपणार आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे. यामुळे पर्यटनक्षेत्रावरही याचा परिणाम झालाय. दरम्यान, हज यात्रेबाबतही अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

'पोक्सो' : गुन्हेगारांना भीती तर नागरिकांच्या पाल्यांना कवच, जाणून घ्या सामान्य माहिती

हज म्हणजे काय?

इस्लाम धर्मात हज यात्रेला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी शेवटच्या महिन्यात ज़िल हिज्जाह येथे हज यात्रा केली जाते. इस्लाम धर्मात पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही त्यांच्या आयुष्यात एकदा हज यात्रा करण्याची तरतूद आहे. हे इस्लामवरील ऐक्य व श्रद्धा यांचे प्रतीक आहे. यासाठी जगभरातून मुस्लिम हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला पोचतात. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे.