यांना कोणीतरी आवर घाला; 'सेल्फी'च्या नादात जीवाला मुकणारही पोरं

Sadawaghapur
Sadawaghapuresakal
Summary

सडावाघापूर येथील उलटा धबधबा व परिसर पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे.

तारळे (सातारा) : सडावाघापूर येथील उलटा धबधबा (Sadawaghapur Reverse Waterfall) व परिसर पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. पावसाळ्यात येथे अक्षरश: जत्रा भरते. आताही पाऊस ओसरला असला तरी भेट देणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. धबधब्याबरोबरच येथील मंत्रमुग्ध करणारे नैसर्गिक वातावरण लोकांना खेचून आणत आहे. या जबरदस्त ‘लोकेशन्स’वर फोटो न काढले तरच नवल. कड्याजवळ धोकादायक स्थितीत सेल्फी व फोटोसेशन केले जात आहे. मात्र, असे करणे जिवावर बेतू शकते, याची कसलीही फिकीर तरुणाईला नाही. फोटोच्या मोहापायी एखादा गंभीर प्रसंग उभा राहण्याची शक्यता असूनही तरुणाई मागे हटत नाही. अशा बेभान तरुणाईला आवरणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटा धबधबा (रिव्हर्स फॉल्‍स) अलीकडे कमालीचे लोकप्रिय झालेले ठिकाण आहे. तरुणाईबरोबरच आबालवृद्धांना या धबधब्यासह येथील वातावरणाची भुरळ पडली आहे. पावसाळ्यात येथील वातावरण अत्यंत मनमोहक असते. हा नयनरम्य परिसर व नजारे डोळ्याने पाहून मनात साठवण्यासाठी व कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी धडपड सुरू असते. मात्र, सेल्फी व फोटो काढण्यासाठी अनेकजण आपला जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर कोणाचाच अंकुश नसल्याने एखादी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

Sadawaghapur
UPSC मुलाखतीला मिळालेत सर्वाधिक गुण; वाचा पहिला प्रश्न आणि उत्तर

सध्या पाऊस ओसरला आहे. कड्याजवळील तळे भरले असल्याने त्यातील पाणी कड्याकडे वाहत आहे. वाऱ्याचा वेग जोरात असल्यास अजूनही उलट्या दिशेने पाणी फेकले जात आहे. हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. शनिवारी व रविवारी विशेष गर्दी दिसून येते. अशा वेळी कड्याजवळ खाली उतरून फोटो व सेल्फी काढले जात आहेत. यात प्रचंड धोका आहे. वाऱ्याचा झोत मोठा आल्यास जिवावर बेतू शकते. मात्र, त्याची फिकीर कोणासही नसते. यावर कोण अन्‌ कसा अंकुश ठेवणार, हा खरा प्रश्न आहे.

Sadawaghapur
जगाला वेठीस धरणाऱ्या चीननं बांधलं 42 फुटबॉल ग्राउंड इतकं 'Quarantine Center'

‘सकाळ’च्या पाठपुराव्याने घातले कुंपण. मात्र, तेही तोडले

या धोक्यासंदर्भात दैनिक ‘सकाळ’ने अनेकवेळा लक्ष वेधले होते. या पाठपुराव्यानंतर येथे तारेचे कुंपण घातले. मात्र, हौशी तरुणाईने तारा उचकटून कुंपणाचे नुकसान केले आहे. तारांमध्ये गॅप पडल्याने त्यातून हौशी तरुणाई कड्याजवळ जात आहे. प्रशासनाने अटकाव करूनही लोक स्वतःहून जीव धोक्यात घालत आहेत. यांना आवर घालणे जरुरीचे आहे, अन्यथा इतर स्थळांप्रमाणे या स्थळालादेखील गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com