esakal | जगाला वेठीस धरणाऱ्या चीननं बांधलं 42 फुटबॉल ग्राउंड इतकं 'Quarantine Center' I Coronavirus
sakal

बोलून बातमी शोधा

China

गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे.

जगाला वेठीस धरणाऱ्या चीननं बांधलं 42 फुटबॉल ग्राउंड इतकं 'Quarantine Center'

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

बीजिंग : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशा स्थितीत लहानमुलांसह सर्वच वयोगटातील व्यक्तींवर कोरोनाचा परिणाम जाणवतोय. एकीकडे कोरोनाचे नियम जगभरात शिथिल केले जात असताना, चीनमध्ये मात्र कोविड निर्बंध आणखी कठीण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. चीन सरकारनं आपल्या देशात शून्य-कोविड धोरण (zero-Covid strategy) काटेकोरपणे अंमलात आणण्याची तयारी सुरु केलीय. गुआंगझाउ शहरात (Guangzhou) चीननं $ 260 दशलक्ष खर्च करून 5000 क्वारंटाइन (Quarantine Center) खोल्यांची निर्मिती केलीय. येत्या काळात मोठ्या संख्येनं परदेशी त्यांच्या देशात येऊ शकतात, असा त्यांचा दावा असल्यानं सरकारनं हा निर्णय घेतलाय.

सीएनएनच्या अहवालानुसार, तपकिरी छप्पर असलेल्या तीन मजली इमारती पारंपरिक चिनी शैलीत बांधण्यात आल्या आहेत. त्याचा आकार 46 फुटबॉल मैदानाएवढा आहे. शहराच्या बाहेरील भागात हे केंद्र बांधण्यासाठी फक्त तीन महिन्यांपेक्षा कमी वेळेचा कालावधी लागलाय. गुआंगझाउ शहरात या केंद्राची निर्मिती करण्यात आली असून या शहरात परदेशी पाहुण्यांचा मोठा ओढा असतो, त्यामुळे या भागात क्वारंटाइन सेंटर बांधली गेली आहेत.

हेही वाचा: UPSC मुलाखतीला मिळालेत सर्वाधिक गुण; वाचा पहिला प्रश्न आणि उत्तर

Quarantine Center

Quarantine Center

या केंद्रात येणाऱ्या प्रवाशांना थेट विमानतळावरून बसेसद्वारे आणलं जाईल आणि त्यांना किमान दोन आठवडे येथे क्वारंटाइन केलं जाईल. या केंद्रात व्हिडिओ चॅट कॅमेरे आणि सुसज्ज खोल्याही उपलब्ध असणार आहेत. शिवाय, रोबोटच्या मदतीनं दिवसातून तीन वेळा प्रवाशांना जेवण अन्न दिलं जाईल. तसेच त्यांची देखभालही केली जाणार आहे. दरम्यान, कौन्सिल फॉरेन रिलेशन्समधील ग्लोबल हेल्थचे वरिष्ठ फेलो याजहोंग हुआंग यांनी सांगितलं, की हे जगातील सर्वात अत्याधुनिक क्वारंटाइन सेंटर असणार आहे.

loading image
go to top