esakal | महाराष्ट्रातील धामपूर सरोवर भारताच्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक
sakal

बोलून बातमी शोधा

Dhampur Lake in Maharashtra is one of the historical monuments of India.jpg

धामपूर सरोवर हे १० एकर क्षेत्रात पसरलेले आहे. हे महाराष्ट्र राज्यातील तारकरळी येथील प्रमुख ठिकाण आहे.

महाराष्ट्रातील धामपूर सरोवर भारताच्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे : महाराष्ट्रातील धामपूर सरोवर हे भारतामधून निवडल्या गेलेल्या चार भारतीय ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आहे. हे ऐतिहासिक वास्तू अनेकांना आकर्षित करत आहे. या पर्यंटन स्थळाला अनेक पर्यटक भेट देऊन जातात.

धामपूर सरोवर हे १० एकर क्षेत्रात पसरलेले आहे. हे महाराष्ट्र राज्यातील तारकरळी येथील प्रमुख ठिकाण आहे. ज्यांना पाणी, तलाव आणि समुद्रकिनारे आवडतात, त्यांच्यासाठी हे मुख्य ठिकाण आहे. डोंगरांनी वेढलेले हे सरोवर राजा नागेश देसाई यांनी 1530 मध्ये बांधले होते. हे सरोवर आरे आणि कट्टा या गावामध्ये आहे. सरोवरचे पाणी (क्रिस्टल क्लीयर) स्फटिकासारखे स्वच्छ आहे. तिथे जवळच भगवती मंदिर आहे, जे येथील सौंदर्य वाढवते आणि हे सरोवर महाराष्ट्राच्या खास पर्यटनस्थळांपैकी एक आहे. चला तर मग, या सरोवराबद्दलच्या खास गोष्टी आणि त्याभोवतीच्या आकर्षणांबद्दल जाणून घेऊयात.

ऐतिहासिक रचनांपैकी एक

महाराष्ट्रातील धामपूर सरोवरला 2020 चा जागतिक वारसा सिंचन पायाभूत सुविधा (WHIS)चा ​​पुरस्कार मिळाला आहे. हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा सरोवर आहे. यावर्षी पुरस्कार मिळविण्यासाठी भारताकडून निवडलेल्या चार भारतीय ऐतिहासिक वास्तूंपैकी धामपूर सरोवर एक आहे. कंबुन टँक, पुरुमिला टँक आणि केसी कालवा यासह आंध्र प्रदेशातील इतर तीन सरोवर भारताकडून देण्यात आले आहेत.

धामपूर सरोवर यासाठी प्रमुख आहे

दरवर्षी धामपूर सरोवरातून 237 हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. कावडेवाडी व गुरुमवाडी धरणातून वाहणार्‍या दोन ओढ्यांमधून तलावाला पाणी मिळते. ही जागा 1530 मध्ये धामपूर आणि काळसे यांच्या ग्रामस्थांनी बनविली होती. भारतातील पहिल्या 100 प्रदेशांपैकी धामपूर सरोवर हे एक आहे. ज्याची ओळख केंद्र सरकारने जलदगती जीर्णोद्धार आणि सुधारणेसाठी केली आहे. आजूबाजूच्या जागेत 193 फुलांच्या आणि 247 प्राण्यांच्या प्रजाती आढळतात.

पाच एकर क्षेत्रात पसरलेले आहे

मालवण तालुक्यातील धामपूर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. सभोवताली दाट सदाहरित झुडपे आणि झाडे आहेत. दोन्ही बाजूंच्या डोंगराच्या मध्यभागी हे ऐतिहासिक सरोवर आहे. या सरोवराच्या काठावर श्री भगवतीचे प्राचीन मंदिर आहे. पाच एकर क्षेत्रात पसरलेल्या विशाल सरोवराचा साठा अत्यंत स्वच्छ आहे आणि नौकाविहाराचा आनंदही इथे घेता येईल.

सुंदर टेकड्यांच्या मधोमध 

धामपूर सरोवरच्या काठावर दोन सुंदर डोंगर आहेत आणि जिथून तुम्हाला कोकम मिळतील. तेथे आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्ही सरोवरच्या आजूबाजूला आंब्याची झाडे आणि नारळाची झाडे देखील पाहू शकता. सरोवरचे पाणी एका आरश्यासारखे स्वच्छ आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही सरोवरच्या पाण्याचे सौंदर्य पाहू शकता. हे सरोवर 10 एकर क्षेत्रात आहे. सरोवरमध्ये बोटिंगसारखे बरेच एक्टिविटीज करता येऊ शकते. मालाबार पाइंड हॉर्नबिल, कॉमोरंट आणि किंगफिशर यासारखे अनेक प्रकारचे पक्षी येथे पाहायला मिळतील.

धामपूर सरोवराजवळ कसे पोहचाल

धामपूर हे मालवण कुडाळ रोडवर आहे. तुम्हाला या भागात महाराष्ट्र राज्य परिवहन बस सेवा मिळू शकेल. सर्वात जवळचे कुडाळ रेल्वे स्टेशन आणि सर्वात जवळचे बेळगाव विमानतळ आहे. मुंबई व बैंगलोरपासून तुम्ही सहज जाऊ शकता.

loading image