Diwali Travel : राजस्थानमधील या शहरात दिवाळी असते खास; असे करा प्लॅनिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Travel : राजस्थानमधील या शहरात दिवाळी असते खास; असे करा प्लॅनिंग

Diwali Travel : राजस्थानमधील या शहरात दिवाळी असते खास; असे करा प्लॅनिंग

पुणे : दिवाळी तोंडावर आली घरी तयारीही सुरू झाली. पण दिवाळी असल्यासारखे काही फिलींगच येईना. असे तुम्हालाही वाटत असेल तर दिवाळीत दिवाळी सारखे फिलींग येण्यासाठी एका ठिकाणी नक्की जा. ते ठिकाण म्हणजे राजस्थान. राजस्थानमधील काही शहरात दिवाळी जल्लोषात साजरी केली जाते.

हेही वाचा: Nashik : Travel Busesची पोलिसांकडून काटेकोर चेकिंग ; अग्नितांडवानंतर 1 बस जप्त

घराघरात दिवाळीची तयारी सुरू आहे. फराळ, खरेदी, पाहुणेमंडळी यांची रेलचेल असेल. माहेरी आलेल्या बहिणींना घेऊन ट्रिपचे प्लॅनिंग करत असाल तर राजस्थानमधील काही ठिकाणे खास आहेत. राजस्थानातील पुष्कर, जयपूर, जैसलमेर या शहरात दिवाळीचा एक वेगळाच उत्साह अनुभवायला मिळतो. पाहुयात ती शहरे कोणती आणि तिथे कशी साजरी दिवाळी होते.

हेही वाचा: Travel Blog: बॅग भरो,निकल पडो; भारतापासून 4 तासाच्या अंतरावर असलेल्या देशात जायलाच पाहिजे!

पुष्कर

राजस्थानमधील पुष्कर शहर हे असे ठिकाण आहे जिथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. दिवाळीच्या दिवशी केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक इथली दिवाळी पहायला ती साजरी करायला येतात. दिवाळीच्या वेळी शहराचे सौंदर्य अप्रतिम असते. इथल्या पुष्कर तलावावर जास्त गर्दी असते. हा तलाव दिव्यांनी सजतो. दिव्यांच्या झगमगाटात दिवाळीचा आनंद द्विगुणीत होतो. दिवाळी दरम्यान येथे 5 दिवसांचा उत्सव देखील आयोजित केला जातो.

हेही वाचा: Travel Story : आयुष्यात एकदातरी अनुभवावी अशी विकेंड ट्रीप, भारतातील बेस्ट रोड!

जयपूर

राजस्थानच्या जयपूर शहरही दिवाळीच्या काही दिवस आधीपासून नववधूप्रमाणे सजते. इथला हवा महल दिव्यांनी सजवला जातो. तेव्हा तो अद्भूत नजारा डोळ्यात साठवण्यासाठी लोक गर्दी करतात. इतर शहरांच्या तुलनेत जयपूरमधील दिवाळी हटके असते. येथे पर्यटकांची अधिक गर्दी असते. येथील बाजारपेठही सुंदर पद्धतीने सजवण्यात आली आहे. इथेही दिवाळीला मोठी जत्रा भरते.Diwali Travel

हेही वाचा: Travel : बाईक ट्रिपला जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

जैसलमेर

पुष्कर आणि जयपूरमध्ये दिवाळीचा सण धूमधडाक्यात साजरा केला जातो. पण जैसलमेर या दोन शहरांपेक्षा कमी नाही. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हे संपूर्ण शहर विद्युत रोषनाईने सजते.मातीचे, कृत्रिम दिवे आणि फुलांनी केलेली इथली सजावट पहायला लोक गर्दी करतात. या आनंदाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. दिवाळीच्या दिवशी तिथल्या लोकांनी घातलेले नवे कपडेही आकर्षक असतात.

हेही वाचा: Travel : विकेंडसाठी परफेक्ट डेस्टीनेशन आहेत महाराष्ट्रातली 'ही' ठिकाणे

जयपूर, पुष्कर आणि जैसलमेर व्यतिरिक्त राजस्थानमध्ये इतर ठिकाणी दिवाळी जल्लोषात साजरी केली जाते. बिकानेर, जोधपूर, उदयपूर आणि कोटा व्यतिरिक्त तुम्ही दिवाळीच्या दिवशी ट्रिपचे प्लॅनिंग करू शकता.