Travel : स्वस्तातली परदेशवारी करायची आहे? पहा हे बेस्ट ऑप्शन |Budget Friendly Trip | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Travel

Travel : स्वस्तातली परदेशवारी करायची आहे? पहा हे बेस्ट ऑप्शन

परदेश भ्रमण करायला कोणाला आवडत नाही. पण, प्रवासाला येणारा खर्च पाहुन ते स्वप्न कधी पूर्ण होईल का असा प्रश्न पडतो. पण, भारताबाहेर असे अनेक देश आहेत. जिथे कमी खर्चात निसर्गाचा अद्भूत नजारा अनुभवता येईल.

इंडोनेशिया देशातील बाली हे बेट हिरव्यागार निसर्गाने समृद्ध आहे. इंडोनेशियातील सर्वात प्रेक्षणीय आणि सांस्कृतिक शहरांच्या यादीत बाली प्रथम क्रमांकावर आहे. हे पर्यटकांसाठी एक अद्भुत ठिकाण आहे.

फॅमिली ट्रिप, सोलो ट्रिपसाठी हे बेस्ट डेस्टीनेशन आहे. इंडोनेशियात तुम्ही महिनाभर फिरू शकता. कारण येथे व्हिसा फ्रि आहे. बाली हे एक जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे ज्याची कला, संगीत, नृत्य आणि आकर्षक मंदिरे मोहक आहेत.

येथील राजधानी देनपसार नगर आहे. उबुद हे मध्य बालीमधील हिल स्टेशन आहे. भारत आणि इंडोनेशियाच्या चलनात इतका फरक आहे की भारतीय पर्यटकांना येथे खूप श्रीमंत वाटते.

हेही वाचा: Diwali Travel : माहेरवाशीनींची बसस्‍थानकावर गर्दी; खानदेशासाठी सर्वाधिक प्रवासी

गिली बेट

इंडोनेशियातील लहान बेटे सुखद अनुभव देणारी आहेत. सर्वात खास गिली बेट आहे. गिली टवांगन, गिली मेनो आणि गिली एअर या तीन बेटांचा हा समूह आहे. पाडांग खाडीतून स्पीड बोटीतून पोहोचायला एक तास लागतो.

येथील समुद्रकिनारे अतिशय स्वच्छ आहेत. समुद्राचे पाणी देखील अतिशय स्वच्छ आहे. बोट पार्ट्या ही इथली शान आहे. बोट राईड करताना 4-5 तास पार्टी आणि मस्तीमध्ये भिजता येते.

बालीचे हृदय कुटा

कुटा, सेमिन्यक आणि जिम्बरान ही दक्षिण बालीमधील प्रसिद्ध ठिकाणे आहेत. कुटा हे बालीचे हृदय आहे. तर सेमिन्याक हा समुद्रकिनारा आहे. येथे हाय-फाय रेस्टॉरंट्स आणि ट्रेंडी फॅशन स्टोअर्स आहेत. दोन्ही ठिकाणे एकमेकांपासून ३ किमी अंतरावर आहेत.

हेही वाचा: Travel : फक्त पाच अमावस्येला या मंदिरात गेल्याने तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊ शकतात

मनमोहक हिल स्टेशन उबुद

उबुद हे इंडोनेशियाचे मनमोहक हिल स्टेशन आहे. ते बालीपासून फक्त 35 किमी आहे. भाताच्या शेतांनी वेढलेले हे हिलस्टेशन प्रसिद्ध आहे. केम्पुहान रिज वॉक हा 1 किलोमीटरचा चालण्याचा ट्रेक आहे. हिरवीगार जंगले आणि भातशेतीचे नयनरम्य दृश्य अनुभवत घेत हा ट्रेक पूर्ण करावा.

पुरा तिरता एम्पुल

हे हिंदूंचे एक तीर्थक्षेत्र आहे. येथे स्नान करणे पवित्र मानले जाते. हे पवित्र स्थान बालीपासून 15 किमी अंतरावर आहे. येथील 'उलुवातु मंदिर' देखील पाहण्यासारखे आहे. येथे दररोज सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होतात. येथे रामायणाचे नाटकही रोज सादर केले जाते.

हेही वाचा: Travel : स्ट्रेस पळवण्यासाठी भारतातले हे धबधबे एक उत्तम ट्रीप प्लॅन असू शकतात

कसे जाणार?

दिल्ली ते बाली हे हवाई अंतर 6,800 किमी आहे. विमानाने बालीला पोहोचण्यासाठी सुमारे 8.15 तास लागतात. बालीला थेट विमान नाही म्हणून बँकॉक, सिंगापूर किंवा कोलालंपूरमार्गे जावे लागते.