Travel : स्ट्रेस पळवण्यासाठी भारतातले हे धबधबे एक उत्तम ट्रीप प्लॅन असू शकतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Travel  news

Travel : स्ट्रेस पळवण्यासाठी भारतातले हे धबधबे एक उत्तम ट्रीप प्लॅन असू शकतात

दिवाळी जवळ येते आहे त्यात दिवाळीच्या सुट्टी मध्ये तुम्हीही स्ट्रेस रिलीफ आणि वातावरण बदला साठी बाहेर ट्रीप प्लॅन करण्याचा विचार करत असाल तर या धबधब्यांना तुम्ही बघू शकतात. अनेकांना प्रवासाची आवड असते. काहींना निसर्गाशी संबंधित ठिकाणे आवडतात, तर काहींना संग्रहालये किंवा ऐतिहासिक ठिकाणी जायला आवडते. खरतर निसर्गाच्या सानिध्यात गेलो की आपलं मनही शांत होत, सध्याच्या धावपळीच्या जगात असा एकांत खूप जास्त स्ट्रेस रिलीफ देतो. कुणाला डोंगरावर जायला आवडते, तर कुणाला समुद्रकिनारी किंवा धबधब्यावर जास्त मजा येते. भारतात पाहण्यासारखे असे अनेक धबधबे आहेत, यातली काही धबधबे आश्चर्यकारक आहेत. त्याला पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात.

हेही वाचा: Diwali Travel : राजस्थानमधील या शहरात दिवाळी असते खास; असे करा प्लॅनिंग

नोहकालिकाई फॉल्स (Nohkalikai Falls)

हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याला तिथून उडी मारलेल्या लिकाई या मुलीचे नाव देण्यात आले आहे. नोहकालिकाई धबधबा 1115 फूट उंच आहे. ही देशातील सर्वात मोठी उडी मानली जाते.

जोग धबधबा (Jog Waterfall)

हा धबधबा कर्नाटकातील शरावती नदीवर आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. जोग धबधब्याची उंची 830 फूट आहे, त्यामुळे हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे.

हेही वाचा: Travel Story : आयुष्यात एकदातरी अनुभवावी अशी विकेंड ट्रीप, भारतातील बेस्ट रोड!

दूधसागर धबधबा (Dudhsagar Falls)

गोवा आणि कर्नाटकच्या सीमेजवळ मांडवी नदीवर हा धबधबा आहे. हा भारतातील एकमेव धबधबा आहे जो दोन राज्यांच्या सीमेच्या मध्यभागी आहे. याला सी ऑफ मिल्क असेही म्हणतात. त्याची उंची 1017 फूट आहे.

होगेनक्कल फॉल्स (Hogenakkal Falls)

हा धबधबा तामिळनाडूच्या धरमपुरी जिल्ह्यात कावेरी नदीवर आहे. त्याला नायगारा फॉल्स असेही म्हणतात. होगेनक्कल धबधब्याच्या पाण्यात औषधी गुणधर्म आढळतात. याशिवाय येथे खास फेरी राइड्स आहेत, ज्यासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे.