
Uttar Pradesh Tourism
esakal
कोणालाही विचारावं की कुठे फिरायला जायचा प्लॅन करायचा तर सर्वजण गोव्यात जातात. कारण, गोव्यातील बिच, तिथे समुद्रातील साहसी खेळ यांची पर्यटकांना भुरळ घालतात. पण उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या काही ठिकाणी तूम्ही गोव्यासारखाच आनंद लुटू शकता.
उत्तर प्रदेश राज्यातील फिरोजाबाद शहरात पर्यटकांसाठी एक इको टुरिझम प्लेस (निसर्ग पर्यटन स्थळ) उभारण्यात आले आहे. रपडी गावात, यमुना नदीच्या काठी हे पर्यटन स्थळ विकसित करण्यात आले असून, येथे पर्यटक आपल्या कुटुंबासह आनंद घेऊ शकतात. याठिकाणी फिरण्यासाठी आणि बोटींगसाठीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.