Goa Holiday Package : गोवाभ्रमंतीसाठी IRCTCने लाँच केलं एअर टूर पॅकेज, जाणून घ्या तारीख व तिकीट खर्चाची संपूर्ण माहिती

ग्राहकांना गोवा भ्रमंती करता यावी यासाठी IRCTCने स्पेशल एअर टूर पॅकेज लाँच केले आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती…
irctc goa package
irctc goa packageSakal

भारत गौरव टुरिस्ट टूर ट्रेनच्या (Bharat Gaurav Tourist Train) माध्यमातून भारतीय रेल्वे (IRCTC) देशातील वेगवेगळ्या भागांतील पर्यटन आणि धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी ग्राहकांना विशेष टूर पॅकेज उपलब्ध करून देत असते. 

तर दुसरीकडे पर्यटनप्रेमींना लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देता यावी, यासाठी एअर टूर पॅकेजेसही सुरू करत आहे. या सुविधेअंतर्गत IRCTCने येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात गोवाभ्रमंतीसाठी एअर टूर पॅकेज लाँच केले आहे.

irctc goa package
Kaas Pathar वर फुलांच्या रंगछटा बहरण्यास सुरुवात; 'या' वेबसाइटवर जाऊन करा Online Booking, उद्यापासून रानफुलांची उधळण

या पॅकेजनुसार पर्यटकांसाठी IRCTC 06 ऑक्टोबर 2023 ते 09 ऑक्टोबर 2023 पर्यंत म्हणजेच तीन रात्री आणि चार दिवसीय पर्यटनाचे पॅकेज लाँच करत आहे.

irctc goa package
Mhatari Pathar : वाऱ्याच्या मंद झुळका अन् ऊन-पावसाचा खेळ.. 'या' पठारावरचा फुलोरा डोळ्याचं पारणं फेडतोय

गोवा पर्यटन पॅकेजमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतील?

पर्यटकांना या टूर पॅकेजमध्ये लखनऊपासून गोव्यापर्यंत पोहोचण्यासाठी विमानाने प्रवास करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था थ्री स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.

irctc goa package
हिरवीगार भातशेती, मंद वाहणारा वारा अन् पांढरेशुभ्र धबधबे..; पश्चिम भागात निसर्गाची मुक्तपणे उधळण, सौंदर्याने सुखावले पर्यटक

गोव्यातील स्थानिक प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी एसी वाहन पर्यटकांच्या सेवेसाठी हजर असेल. या सहलीदरम्यान गोव्यातील मंगुशी मंदिर, अगुआडा किल्ला, अंजुना बीच, बेंझ सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम, बॅसिलिका ऑफ बोन जीझस चर्च, मीरामार बीच तसंच संध्याकाळच्या वेळेस मांडवी नदीवरील क्रूझ, बागा बीच, कँडोलिम बीच आणि स्नो पार्क या स्थळांना भेट देण्यात येणार आहे.   

सहलीची खर्च किती असावा?  

  • IRCTCने लाँच केलेल्या या टूर पॅकेजनुसार तीन प्रवाशांनी एकत्रित प्रवास केल्यास एका व्यक्तीला गोवा भ्रमंती पॅकेजसाठी 30 हजार 800 रुपये इतके रूपये मोजावे लागणार आहेत.

  • दोन व्यक्तींना एकत्रित प्रवास करायचा असल्यास पॅकेजचा खर्च प्रति व्यक्ती 31 हजार 200 रूपये इतका असणार आहे.

  • सोलो ट्रिप करणाऱ्याला या पॅकेजसाठी 37 हजार 700 रूपये मोजावे लागतील.

  • आईवडिलांसह प्रवास करणाऱ्या अपत्याच्या पॅकेजची किंमत 27 हजार 350 रूपये इतकी असेल आणि बेड न घेतल्यास 26 हजार 950 रूपये मोजावे लागतील. 

कसे करावे बुकिंग?

  • गोवाभ्रमंतीसाठी असलेल्या या पॅकेजचे बुकिंग करण्यासाठी www.irctctourism.com या संकेतस्थळावर आपण ऑनलाइन देखील बुकिंग करू शकता. 

किंवा

  • पर्यटन भवन, गोमती नगर, लखनऊ तसंच कानपूरमधील आइआरसीटीसी कार्यालयात जाऊनही पॅकेज बुकिंग करू शकता.

 किंवा

  • अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि बुकिंग करण्यासाठी खालील मोबाइल क्रमांकांवरही संपर्क साधू शकता  

    - लखनऊ- 8287930911/8287930902

    - कानपूर-8287930927/8287930930

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com