Honeymoon Tips : जोडीदारासोबतच्या पहिल्याच ट्रिपला या चुका टाळा; नाहीतर हनिमून जाईल खड्ड्यात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Honeymoon Tips

Honeymoon Tips : जोडीदारासोबतच्या पहिल्याच ट्रिपला या चुका टाळा; नाहीतर हनिमून जाईल खड्ड्यात!

लग्नानंतर पार्टनरसोबतची पहिली ट्रिप म्हणजेच हनिमून हा आयुष्यातील एक खास क्षण असतो. कधीही न भेटलेले लोक एकमेकांना समजून घेऊन प्रेम व्यक्त करतात. त्यामूळे हनिमून खास बनवण्यासाठी फॅमिलीमेंबरही काही टिप्स आणि पॅकेज भेट देत असतात. पण, तरीही पार्टनरच्या काही शुल्लक चूका हनिमूनचा मुड खराब करतातच.

नाते नवे असताना जोडीदार भलेही मनातील नकारात्मकता एकमेकांसमोर येऊ देत नसतील. पण या चूका तूमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आणू शकतात. त्यामूळे कोणत्या चूका टाळता येऊ शकतात. आणि तूमचा टाईम अधिक स्पेशल कसा बनवता येईल हे पाहुयात.

हेही वाचा: Eucalyptus Oil Benefits : पायाला निलगिरी तेल लावा अन् चमत्कार बघा!  

परफेक्ट प्लॅनिंग करा

तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही रोमँटिक क्षण एन्जॉय करयाचे असतील. तर त्यासाठी तयारी करणे देखील आवश्यक आहे. कुठे जायचे आहे, कसे पोहोचायचे आहे, या सर्व गोष्टींचा प्लॅन लग्नाआधी करा. जोडीदाराला कुठे जायचे आहे, तिचे आवडचे ठिकाण कुठले आहे, याचाही विचार करा आणि मगच हनिमून प्लॅन करा.

पार्टनरचे मत घ्या

काही लोकांना वाटते की त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्य असेल, या प्रकरणात त्यांचे नुकसान देखील होते. हनिमूनच्या ठिकाणापासून ते तिथे राहण्यापर्यंत आणि खरेदी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी जोडीदाराचा सल्ला घ्या.

हेही वाचा: Anarkali Suit Fashion : लग्नापासून ते कॅज्यूअल वेअरपर्यंत सर्वांसाठी परफेक्ट असा एकमेव सूट

आर्थिक बाबतीत हात सैल सोडा

ट्रिपवर गेल्यावर केलेल्या किरकोळ चूका आयुष्यातील स्पेशल क्षण खराब करू शकतात. हनिमून बजेटमध्ये बसवण्यासाठी खरेदी करताना. किंवा हॉटेलवर असताना पैशांच्या बाबतीत कंजूष बनू नका. त्याने पार्टनरवर वाईट इंप्रेशन पडेल.

हेही वाचा: Anarkali Suit Fashion : लग्नापासून ते कॅज्यूअल वेअरपर्यंत सर्वांसाठी परफेक्ट असा एकमेव सूट

जोडीदाराला मोकळेपणाने समजून घ्या

हनिमून हा तूमच्या दोघांचा स्पेशल टाईम असतो. त्यामूळे पार्टनरला काय कपडे घालायाचे आहेत, ते तिचे तिला ठरवूदेत. तूम्ही तिच्यावर बंधन घालू नका. तिला काय आवडतं हे समजून घ्या.