Azerbaijan: बजेट नाही पण फॉरेन फिरायचंय? दुबईपेक्षाही स्वस्तात युरोप टूर कशी करायची घ्या जाणून

दुबईपेक्षाही स्वस्तात युरोप टुर कशी करायची घ्या जाणून
How to tour Europe on the cheap budget
How to tour Europe on the cheap budgetSakal

अझरबैजान आता भारतीय पर्यटकांसाठी लोकप्रिय पर्याय बनत आहे. इंस्टाग्रामवर रील्स तयार करणे असो किंवा ट्रॅव्हल व्लॉग बनवणे असो, अझरबैजानची राजधानी बाकू सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. बाकू हे गजबजलेले शहर आहे. हे ठिकाण जगभरातील पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. SkyScanner च्या ट्रॅव्हल ट्रेंड्स 2024 च्या अहवालानुसार, बाकू सर्च ट्रेंड 2023 मध्ये 438% वाढ झाली आहे. आता प्रश्न असा पडतो की या देशात जाण्याची सर्वांनाच अचानक उत्सुकता का निर्माण झाली आहे.

तीन दिवसात व्हिसा मिळेल

टुरिस्ट व्हिसा मिळणे अवघड काम आहे. अनेक वेळा व्हिसामुळे लोक त्यांचे प्लॅन पोस्टपोन करतात. परंतु अझरबैजानने अलीकडेच भारतीयांसाठी ई-व्हिसाची प्रक्रिया सुलभ केली आहे. त्यामुळेच बाकूला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे.

यापूर्वी तुम्हाला अझरबैजानच्या राउंड ट्रिपसाठी सुमारे 50 हजार रुपये खर्च करावे लागत होते, परंतु आता ते फक्त 26 हजार रुपयांमध्ये करता येते. स्कायस्कॅनरच्या अहवालानुसार, 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये भारतातून अझरबैजानपर्यंतच्या फ्लाइट तिकिटांच्या किमती 22 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

How to tour Europe on the cheap budget
Pre Wedding Photoshoot : प्री-वेडींग फोटोशूट प्लॅन करताय? मग कोलकातामधील ही ठिकाणं आहेत बेस्ट..

अझरबैजान इतर देशांपेक्षा स्वस्त आहे. विशेषतः जर आपण युरोपकडे पाहिले तर. अझरबैजानमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती भारताप्रमाणेच आहेत. तुम्ही हॉटेलमध्ये किंवा मॅकडोनाल्ड किंवा इतर फास्ट फूड चेनमध्ये 1,500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खाऊ शकता.

याशिवाय तुम्ही दिल्ली ते बाकू नॉन स्टॉप फ्लाइट घेऊन अवघ्या ५ तासात तुमच्या डेस्टिनेशनर पोहोचू शकता. भारतीयांना युरोपमध्ये फिरायला आवडते. इतकंच नाही तर व्हिसाची प्रक्रियाही खूप अवघड आहे.

अशा प्रकारे तुम्ही ई-व्हिसा घेऊ शकता

ऑनलाइन सरकारी पोर्टलद्वारे अर्ज करा.

डेटा भरा आणि पेमेंट करा

तुम्हाला तुमचा व्हिसा तीन दिवसात ईमेलद्वारे मिळेल.

व्हिसासाठी तुम्हाला 20 यूएस डॉलर (सुमारे 1,600 रुपये) खर्च करावे लागतील.

किती येईल खर्च

मुंबई टू अझरबैजान तिकीट

  • पर पर्सन फ्लाईटचे तिकीट - 26,000 रुपये

व्हिसा

  • व्हिसासाठी - 2000 रुपये

एअरपोर्ट ट्रान्सपोर्ट

  • प्रायव्हेट टॅक्सीची किंमत - 2000 रुपये

  • एयरो एक्सप्रेस बस - 200 रुपये

इंटरनल ट्रान्सपोर्ट

  • मेट्रो- 100

  • टॅक्सी - 200

हॉटेल बुकिंग

  • बजेट - 1500

  • मिड लक्जरी - 3000

  • लक्जरी - 10000

फूड

  • बजेट - 1000

  • कॅफे - 3000

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com