Jagannath Temple: फक्त पुरीच नाही, तर इथेही आहेत भगवान जगन्नाथाची प्रसिद्ध मंदिरं; जाणून घ्या

भगवान जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला थेट पुरीला जाण्याची गरज नाही.
Jagannath Temple
Jagannath TempleeSakal

ओडिशातील पुरीचे जगन्नाथ मंदिर हे जगभर प्रसिद्ध आहे. मंदिराच्या गर्भगृहात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती दर 12 वर्षांनी बदलल्या जातात. मंदिरातील मूर्ती बदलल्यानंतर मूर्तींमधून ब्रह्म द्रव्य काढून नवीन मूर्तींना ठेवल्या जातात. मात्र भगवान जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला थेट पुरीला जाण्याची गरज नाही. याव्यतिरिक्त देशात आणखीही काही ठिकाणी अशी मंदिरं आहेत.

Myanmar Jagannath Temple
Myanmar Jagannath TempleeSakal

म्यानमार

म्यानमारमध्ये देखील एक प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर आहे. नायपीडाव येथील जगन्नाथ मंदिरात देश-विदेशातील लोक येतात. पुरीमध्ये ज्याप्रमाणे जशी भगवान जगन्नाथांची पूजा केली जाते, अगदी तशीच पूजा इथेही करतात. इथे सर्व प्रथाही पाळल्या जातात.

Delhi Jagannath Temple
Delhi Jagannath TempleeSakal

दिल्ली

राजधानी दिल्लीच्या होज खासमध्ये भगवान जगन्नाथाचे मंदिर आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी भारतातील दूरदूरचे लोक येतात. याठिकाणी अनेकदा लोकांची गर्दी पाहायला मिळते.

Telangana Jagannath Temple
Telangana Jagannath TempleeSakal

तेलंगणा

तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथेही एक जगन्नाथ मंदिर आहे. जगन्नाथ मंदिरात लोकांची गर्दी जमते. पुरीच्या मंदिराप्रमाणेच जगन्नाथ मंदिर येथे बांधले आहे.

Jagannath Temple
Hindu Religion : जगन्नाथ मंदिराचे हे रहस्य सांगत अशा अज्ञात ऊर्जेविषयी, जी समजणे अशक्य
Gujarat Jagannath Temple
Gujarat Jagannath TempleeSakal

गुजरात

गुजरातमधील अहमदाबादचे जगन्नाथ मंदिरही खूप प्रसिद्ध आहे. अहमदाबादमध्ये भगवान बलभद्र, सुभद्रा आणि जगन्नाथ यांची रथयात्राही काढली जाते. येथे पुरीच्या मंदिरासारख्या प्रथा पाळल्या जातात.

Jagannath Temple
Jagannath Rath Yatra 2023 : जगन्नाथ यात्रेतील मूर्तीरूपी प्रतिमा आजही का 'अर्धवट'? जाणून घ्या कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com