esakal | पर्यटकांनो, फिरायला जायचा प्लान लवकर करा; कास पठारचा हंगाम संपत आलाय I Kas Pathar
sakal

बोलून बातमी शोधा

Kas Pathar
कास पठारावर पंधरा ऑक्टोबरपासून ऑनलाइन बुकिंग बंद करण्यात आलीय.

पर्यटकांनो, फिरायला जायचा प्लान लवकर करा; कास पठारचा हंगाम संपत आलाय

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

कास (सातारा) : दोन वर्षांच्या कोरोना ब्रेकनंतर (Coronavirus) या वर्षी चालू केलेला पुष्प पठार कासचा हंगाम (Kas Pathar Season 2021) समाप्तीकडे आला असून पंधरा ऑक्टोबरपासून ऑनलाइन बुकिंग बंद करण्यात आलीय. पठारावर तिसऱ्या टप्प्यात येणारी मिकी माऊस व सोनकीची पिवळी धम्मक छटा अद्याप ही पाहावयास मिळत आहे. ऑनलाइन बुकिंग बंद (Kas Pathar Online Booking) करण्यात आले असले, तरी येणाऱ्या पर्यटकांना ऑफलाइन पद्धतीने जाळीच्या आतमध्ये जावून ज्यांना फुलं पाहायची आहेत, त्यांना तिकीट घेऊन फुले पाहता येतील, असं सांगण्यात आलंय.

कास पुष्प पठारावरील नैसर्गिक रानफुलांचा हंगाम समाप्तीबरोबरच पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघही ओसरल्याचे दिसत आहे. पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडणारा कास पठारवरील नैसर्गिक रंगीबेरंगी फुलांचा हंगाम २५ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांनी पठारला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. मात्र, पठारावर सर्वात जास्त आणि प्रमुख आकर्षित ठरणारी गुलाबी तेरडा जातीची फुले अतिपावसामुळे अगदी कमी प्रमाणात उमलल्याने पर्यटकांची नाराजी पाहावयास मिळाली.

हेही वाचा: Hot Air Balloon राइडचा आनंद घ्यायचा आहे? 'ही' आहेत भारतातील सर्वोत्तम ठिकाणं

मात्र, पांढरा गेंद, निळी जांभळी सीतेची आसव, कापरू, पिवळा मिकी माऊस व कुमुदिनी तळ्यातील कमळे ही जास्त प्रमाणात बहरल्याने पर्यटकांची खास आकर्षण ठरत होती. आता पठारावर पांढरा गेंद, पिवळी मिकी माऊस व इतर जातीची फुले आहेत, परंतु जास्त प्रमाणात गवत वाढल्याने ती कमी प्रमाणात दिसत आहेत. पठारवरील फुलांचे प्रमाण कमी झाल्याने आता येणारे पर्यटक कास तलाव, कोयना जलाशयातील बामणोली बोट क्लबला भेट देऊन, बोटिंगचा आनंद लुटत आहेत.

हेही वाचा: दसऱ्याच्या 6 दिवसांच्या सुट्टीत 'या' 10 ठिकाणी प्लॅन करा सहल

सौंदर्याचा खजाना वर्षभरासाठी लुप्त होणार

परतीचा पाऊस गेली चार दिवस पडलेला नाही. थंडीची चाहूल लागली असून उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे पठारावर येणारे धुके, अधून-मधून कोसळणारा पाऊस असे आल्हाददायक वातावरण बंद झाल्याने पठारावरील हिरवाई करपू लागलीय. असेच वातावरण राहिल्यास पठारावरील फुलांसह गवतही लवकरच वाळून हा सौंदर्याचा खजाना वर्षभरासाठी लुप्त होणार आहे.

loading image
go to top