Amazing Trekking Places: नव्या वर्षात मित्रांसोबत मज्जा करा! विलक्षण सुंदर दृश्ये अन् निसर्ग सानिध्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amazing Trekking Places

Amazing Trekking Places: नव्या वर्षात मित्रांसोबत मज्जा करा! विलक्षण सुंदर दृश्ये अन् निसर्ग सानिध्य

Amazing Trekking Places: नव्या वर्षात सगळी मित्रमंडळी कुठेना कुठे फिरायला जात असते. तुम्हीही नक्कीच कुठेतरी जाण्याचा प्लान करतच असाल. तुम्ही ट्रेकिंग करण्यास उत्सुक असाल तर ही काही ठिकाणं तुंमच्यासाठी बेस्ट ठरतील. या जागेला ट्रेकिंगचा स्वर्ग म्हटले जाते.

दरवर्षी ट्रेकिंगची आवड असणारे लोक 'केदारकांठा'मध्ये जातात. क्रिसमस आणि न्यू इयरच्या वेळेत येथे तुम्हाला पर्यटकांची गर्दी दिसून येईल. येथे तुम्हाला ट्रेकिंगचा बिनधास्त आणि मजेशीर अनुभव घेता येईल.

सांकरी हा ट्रेकिंगचा बेस आहे असे म्हटले जाते. येथे तुम्ही उंच ठिकाणी वाहनांनीही जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला १० किमी पायदळ ट्रेकिंग सुरू करावी लागते. येथील ट्रेकिंगमध्ये विशेष म्हणजे येथे तुम्हाला रस्त्याने चौफेर जंगल, बर्फाने आच्छादलेला तलाव, लुशलुशीत गवत, आकाशाला स्पर्श करणाऱ्या पर्वतरांगा बघायला मिळतील.

केदारकंठा हे ट्रेकिंगचं मुख्य आकर्षण आहे. थंडीमध्ये येथील तलाव संपूर्ण गोठून जातो. तुम्ही त्यावर चालू शकता एवढा बर्फ त्यावक साचलेला असतो. (Tourism)

जूडा तलावाजवळ सगळे ट्रेकर्स थांबून कँपिंग करतात. येथून पुढे केदारकांठा पीकवर चढाई केली जाते.

केदारकांठा पर्वतावर ट्रेकर्सना स्वर्गारोहिणी, व्हाइट माउंटेन, कालानाग, गरूड पर्वत आणि गंगोत्री रेंज इत्यादी अप्रतिम दृश्ये बघायला मिळतील. येथे तुम्हाला वर्षभर ट्रेकर्सची गर्दी दिसून येईल.

केंदारकांठा एक तीर्थस्थळसुद्धा आहे. असे म्हटले जाते की या प्रदेशाची सुंदरता बघून केदारनाथ खुद्द येथे विराजमान झाले होते. या जागेला धार्मिक महत्वसुद्धा आहे.