esakal | देशभर पर्यटन स्थळी गरज ‘Accessible Tourism’ची
sakal

बोलून बातमी शोधा

Accessible Tourism’

देशभर पर्यटन स्थळी गरज ‘Accessible Tourism’ची

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे : पर्यटनाला जाईच म्हंटल की फिरस्त्यांच्या मनात उत्साहाचे वातावरण निर्माण होतो. ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले, उद्याने, मंदिरे, जंगल सफारीसारखे अनेक ठिकाण त्यांच्या पसंतीची असतात. मात्र, देशातील अनेक पर्यटन स्थळे अशी आहेत की जिथे दिव्यांगांसाठी सोय सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे पर्यटन केवळ सर्वसामान्यांपूरतेच मर्यादित राहिल्याचे चित्र देशातील विविध पर्यटनस्थाळांवर दिसून येत आहे.

दिव्यांगांना देखील पर्यटन स्थळांचा आनंद घेता यावा यासाठी ‘ॲक्सिसीबल ट्युरिझम’च्या अनुषंगाने पर्यटनस्थळांमध्ये सुविधा उपलब्ध करण्याची गरज असल्याचे पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. एक्सिसीबल अण्ड इंक्लूझीव ट्युरिझम तज्ज्ञ व डॉ. बी. आर. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्रा. डॉ. कविता मुरूगकर म्हणाल्या, ‘‘पर्यटनाची धोरणे तयार करताना केवळ सामान्य लोकांच्या सोयी सुविधांवर सर्वाधिक भर दिला जातो. देशात सुमारे १० टक्के दिव्यांग नागरिक आहेत. मात्र, कित्येक वेळा सोयी सुविधांच्या अभावामुळे या वर्गाला पर्यटनासाठी बाहेर पडताना अडचणी उद्‍द्भवतात. तर दृष्टिहीन लोकं हे स्पर्शच्या माध्यमातून वास्तू किंवा वस्तूंची माहिती घेतात. कित्येक ठिकाणी वास्तूला किंवा वस्तूंना स्पर्श करण्यास मनाई असते. पर्यटनाचा अधिकार सामान्य लोकांप्रमाणे दिव्यांगांना सुद्धा आहे. पर्यटनाशी निगडित धोरणे आखताना प्रशासनाने त्यासाठी विविध विभागांशी समन्वय स्थापित करणे आवश्‍यक आहे. यामुळे पर्यटनस्थळांच्या जागेला कोणताही धक्का न पोचविता चांगल्या सुविधांची रचना तेथे करणे शक्य आहे.’’

हेही वाचा: फिरणं बंद असलं म्हणून काय झालं? घरीच बनवा हॉलीडेचा माहोल

या सुविधांची गरज

 • माहिती फलकांवर ब्रेल लिपीचा वापर

 • पर्यटन स्थळाबाबत माहिती देण्यासाठी गाइड

 • सांकेतिक भाषेचा वापर किंवा ऑडिओ-व्हिडिओद्वारे माहिती देणे

 • टिकीट काऊंटरपर्यंत ते सहज पोहोचू शकतील अशा पद्धतीने तेथील रचना

 • सांकेतिक भाषा समजणाऱ्या व्यक्तींची नेमणूक

 • व्हिलचेअरच्या सुविधा व त्यासाठी रॅम्प व इतर गोष्टी

 • गड किल्ले किंवा उंच शिखरावर पर्यटन करण्यासाठी रोपवेची सुविधा

या आहेत अडचणी

 • देशातील बहुतांश पर्यटनस्थळी दिव्यांगांच्या सुविधांची कमतरता

 • पर्यटनाचे धोरण ठरवताना दिव्यांगांचा विचार होतोच असे नाही

 • सुविधा उपलब्ध केल्या तर कोणालाही शिक्षा होत नाही

 • दिव्यांगांसाठी उपयुक्त आणि सोईस्कर असे स्वच्छतागृह नाही

हेही वाचा: अंदमान-निकोबारवरील नील बेट अतिशय सुंदर..जाणून घ्या माहिती

''जागतिक पर्यटन संस्थेच्या (यूएनडब्ल्यू) निकषांनुसार पर्यटन हे सर्वांसाठी आहे. पर्यटन हे दिव्यांगांसाठी नाहीच, असे गृहीत घेत धोरणे बनवली जात आहेत. जिल्ह्यातील पर्यटनाचा आराखडा तयार करताना दिव्यांगाचा विचार करणे गरजेचे आहे. सध्या दिल्ली, राजस्थान येथे काही पर्यटनस्थळावर दिव्यांगांसाठी काही प्रमाणात सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच दिव्यांगांसाठीच्या कायद्याला पाहता त्याची अंमलबजावणी देखील त्या पद्धतीने होत नाही. त्याचबरोबर कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास कोणतीही शिक्षा त्यासाठी नाही. प्रत्येक पर्यटनस्थळाची अॅक्सिस ऑडिट’ करण्याची गरज आहे.''

- डॉ. संजय जैन, प्राचार्य, आयएलएस

''प्रकल्पानुसार दिव्यांगासाठीच्या सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. सर्वांना पर्यटनाचा लाभ घेता यावा याबाबतच राज्य सरकारचे धोरण तयार आहे. पर्यटनाच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी कोणत्या सुविधा आवश्‍यक आहेत, याची सविस्तर माहिती त्यात आहे.''

- सुप्रिया दातार, उपसंचालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

loading image