esakal | फिरणं बंद असलं म्हणून काय झालं? घरीच बनवा हॉलीडेचा माहोल
sakal

बोलून बातमी शोधा

फिरणं बंद असलं म्हणून काय झालं? घरीच बनवा हॉलीडेचा माहोल

फिरणं बंद असलं म्हणून काय झालं? घरीच बनवा हॉलीडेचा माहोल

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे: अनेकजण सुट्ट्यांमध्ये पिकनिक, मित्र मैत्रिणीसोबत आउटिंगचा आनंद घेत होते, अचानक कोरोना मुळे सर्वकाही थांबले आहे. पण आता तुम्हीही घरात असे वातावरण तयार करु शकता. आणि त्याचा आनंद घेऊ शकता.

हेही वाचा: ‘रोझलॅंड’ ठरतेय पिकनिक डेस्टिनेशन

अनेकांना काही नवीन ठिकाणी फिरायला जायला खूप आवडते. गेल्या दोन वर्षांपासून प्रवासावर बंदी आहे. काही महिन्यांच्या मध्यात असे वातावरण तयार झाले होते, परंतु नंतर या कोरोनाने सर्व काही थांबवले. पिकनिक, पार्टीज हे सर्व काहीजण विसरले आहेत. आता फोनवर मित्र मैत्रिणीसह प्लॅन देखील बनविले जात आहेत. फॅमिली गेट-टुगेदरच्या नावाखाली व्हिडीओ कॉल्स केले जातात. फक्त या काही गोष्टी मनाला शांती देतात. तुम्ही सुद्धा सुट्ट्या गमावत असाल तर अशा काही टिप्स वापरुन पहा. ज्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही.

बाल्कनी सहल

बाल्कनी सहल

बाल्कनी सहल

आत्ता पिकनिकसाठी बाहेर जाणे मुळीच शक्य नाही, म्हणून घरीच पिकनिकसारखे वातावरण तयार करता येते. आजकाल ही पद्धत देखील ट्रेंडमध्ये खूप आहे. तुम्ही तुमची बाल्कनी योग्य प्रकारे सजवून लायटिंग करू शकता आणि नंतर तुमच्या कुटुंबासोबत लंचचा आनंद घेऊ शकता. आठवड्याच्या शेवटी अशी फॅमिली पिकनिकने सुट्टीचा आनंद घेण्याचा एक चांगला मार्ग आहे.

ड्रेसिंग

ड्रेसिंग

ड्रेसिंग

तुम्ही कुठेही जात नसल्यास याचा अर्थ असा नाही की तुम्ही चांगले कपडे घालू शकत नाही. किंवा तयार होऊ शकत नाही. जसे तुम्ही घराबाहेर जाण्यासाठी तयार होता, त्याचप्रमाणे कधीकधी आपल्या घरी कपडे घालून बसा. सुंदर कपडे घाला. आपल्यासाठी ते आरामदायक असेल. त्याच वेळी, तुम्ही सुट्टीसाठी ठेवलेले ड्रेसेस घालून, कुटुंबासोबत काही फोटोज काढा.

रेस्टॉरंटसारखे स्वादिष्ट पदार्थ

रेस्टॉरंटसारखे स्वादिष्ट पदार्थ

घरी रेस्टॉरंटसारखे स्वादिष्ट पदार्थ बनवा

आता आपण बाहेर जात नसल्याने कोणत्याही एक्जॉटिक व्हेकेशनमध्ये नसल्यास तेथे जाणे आणि स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेणे थोडे अवघड आहे. परंतु आपण घरी आपल्या कुकिंग टॅलेंट दाखवू शकता. असं असलं तरी, गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे बर्‍याच लोकांच्या आतील शेफ जागा झाला आहे. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे टेस्टी डिशेस बनवू शकता. तुम्ही जिथे जिथे गेला असाल तेथील स्थानिक ताजे पदार्थ घरी बनवू शकता. यामुऴे तुम्हाला व्हेकेशनवर असल्यासारखे वाटेल.

व्हर्च्युअल टूर

व्हर्च्युअल टूर

व्हर्च्युअल टूर

आपण घरी बसून व्हर्च्युअल टूरवर जाऊ शकता. तुम्हाला संग्रहालय, प्राणीसंग्रहालय, हायकिंग किंवा ट्रेकिंग करायचे असेल तर फक्त Googleउघडा आणि आपल्या व्हर्च्युअल टूरसाठी सज्ज व्हा. याद्वारे तुम्ही मंगळावर पोहोचू शकता. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तुमचा प्रवास खर्च देखील वाचला जाईल, तसेच त्याचा फायदा देखील तुम्हाला होईल. या व्यतिरिक्त, तुम्हाला बेडवरुन उठण्याची देखील आवश्यकता नाही. तुम्ही बसल्या जागीच सर्व ट्रिप्स पूर्ण करू शकता.

व्हिडिओ कॉल पार्टी

व्हिडिओ कॉल पार्टी

व्हिडिओ कॉल पार्टी

या लॉकडाऊनमुळे लोकांना भेटण्याचा एकच मार्ग शिल्लक आहे, तो म्हणजे व्हिडिओ कॉल. तुम्ही तुमच्या मित्रांसह थीम पार्टी आयोजित करू शकता. सर्वांना मस्त तयार होऊन बसा. आपल्या संबंधित घरांमध्ये गाणी प्ले करा, बॅगराऊंड सजवा आणि चांगले जेवण करा आणि मित्रांसह गप्पा मारत बसा. येत्या विकेंडला तुम्ही यासारखे काहीतरी प्लॅन नक्कीच करु शकता.

ट्रव्हल मुव्हीज

ट्रव्हल मुव्हीज

घरीच ट्रव्हल मुव्हीज पहा

प्रवास करताना जे काही ट्रव्हल मुव्हीज पाहायला आवडतात. तर तुम्ही तेच मुव्ही घरी बसून पाहू शकता. आणि त्याचा आनंद घेऊ शकता.

loading image