Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे दर्शन घ्यायचे आहे? मग, महाराष्ट्रातील 'या' मंदिरांना नक्की द्या भेट

Mahashivratri 2024 : सध्या सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह पहायला मिळतोय. यंदा देशात ८ मार्चला महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.
Mahashivratri 2024
Mahashivratri 2024esakal

Mahashivratri 2024 : सध्या सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह पहायला मिळतोय. यंदा देशात ८ मार्चला महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता, असे मानले जाते. त्यामुळे, या दिवसाचे खास असे महत्व आहे.

या दिवशी अनेक जण महाशिवरात्रीचे व्रत करतात, उपवास करतात. भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची महाशिवरात्रीला विधीवत पूजा केली जाते. महादेवांचे असंख्य भक्त भोलेनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये गर्दी करतात.

जर यंदाच्या महाशिवरात्रीला तुम्ही देखील महादेवांचे दर्शन घेण्याचा विचार करत असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला देशातील काही प्रमुख महादेवांच्या मंदिरांबद्दल सांगणार आहोत. कोणती आहेत ही मंदिरे? जिथे तुम्ही भेट देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात.

बाबुलनाथ मंदिर

बाबुलनाथ मंदिर हे मुंबईमध्ये स्थित असलेले महादेवाचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. मुंबईतल्या एका छोट्या टेकडीवर हे मंदिर वसलेले आहे. विशेष म्हणजे मुंबईतल्या जुन्या मंदिरांपैकी एक म्हणून हे मंदिर ओळखले जाते. भगवान शंकराला हे मंदिर समर्पित आहे.

या शिवमंदिरात महादेवाचे भव्य शिवलिंग असून, त्यासोबतच गणपती, हनुमान आणि देवी पार्वतीच्या देखील मूर्ती या ठिकाणी विराजमान आहेत. असे म्हटले जाते की, या सर्व मूर्ती बाराव्या शतकात मंदिरात ठेवण्यात आल्या होत्या. महाशिवरात्रीनिमित्त असंख्य भाविक या मंदिराला आवर्जून भेट देतात. तुम्ही देखील या मंदिराला भेट देऊ शकता. (Babulnath Temple)

भीमाशंकर ज्योर्तिलिंग

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात स्थित असलेले हे भीमाशंकर ज्योर्तिलिंग असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी देश-विदेशातील असंख्य भाविक भेट देत असतात. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते.

सह्याद्रीच्या डोंगररांगातील घाट प्रदेशात हे प्राचीन शिवमंदिर स्थित आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराप्रमाणेच हे मंदिर देखील भगवान शंकराच्या बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक आहे. त्यामुळे, या मंदिराचे खास असे महत्व आहे. विशेष म्हणजे महाशिवरात्रीनिमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. (Bhimashankar Jyotirlinga)

कैलाश शिव मंदिर एलोरा

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा-वेरूळची लेणी ही जगप्रसिद्ध आहे. ही लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गर्दी करतात. ज्या लोकांना इतिहासाची आवड आहे, असे लोक या ठिकाणी आवर्जून भेट देतात.

या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इतिहास जवळून पाहण्याची संधी मिळते. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का? की, या ठिकाणी महादेवाला समर्पित असलेले सुप्रसिद्ध कैलाश मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण मंदिर केवळ एका मोठ्या खडकात बांधण्यात आणि कोरण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त अनेक भाविक या ठिकाणी गर्दी करतात. तुम्ही देखील महाशिवरात्रीनिमित्त या मंदिराला भेट देऊ शकता. (Kailash Shiva Temple Ellora)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com