esakal | गोव्यात हनीमूनला जाण्याचा आहे प्लॅन; तर गोव्यात कुठे जायचे जाणून घ्‍या
sakal

बोलून बातमी शोधा

goa haneymoon trip

गोव्यात हनीमूनला जाण्याचा आहे प्लॅन; तर गोव्यात कुठे जायचे जाणून घ्‍या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारतात सध्या लग्नाचा सिजन सुरु झाला आहे. त्यामध्ये बऱ्याच जोडप्यांनी गोव्याला हनीमून डेस्टिनेशन बनवलं असेल. भारताच्या बेस्ट हनीमून डेस्टिनेशनच्या यादीत गोवा नेहमी अव्वल स्थानी असतो. इथलं वातावरण, बीचेस, पर्यटनस्थळे आणि ठिकाणे हनीमून कपलला रोमँटिक क्षण घालवण्यासाठी भारी आहेत. चला तर मग गोव्यातील हनीमून प्लॅनसाठी काय करता येईल त्याबद्दल जाणून घेऊया.

हनीमूनसाठी फेब्रूवारीत कोणते ठिकाण भारी आहे?

फेब्रूवारी महिन्यात बेस्ट डेस्टिनेशन्स सूचीत गोवा नेहमी अव्वल असेल. जोडप्यासांठी हा एक स्वर्गच आहे. इथं तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निवांत क्षण घालवू शकता. गोव्यात भारतातील काही उत्तम बीच आहेत.

हनीमून कपल्ससाठी गोव्यातील कोणता भाग सर्वोत्तम आहे?

हनीमून डेस्टिनेशनसाठी गोव्याची एक वेगळीच ओळख आहे. इथं रोमँटिक टूअरसाठी नॉर्थ गोवा आणि साउथ गोवा दोन्हीही कमालीचे ठिकाणे आहेत. या दोन्ही भागात डेस्टिनेशन तुम्ही अविस्मरणीय हनीमून करू शकता. या भागात शांतता आणि एकांतही मिळू शकेल.

गोव्यातील कोणता बीच कपल्ससाठी सर्वोत्तम आहे?

गोव्यात जोडप्यांसाठी बटरफ्लाई बीच सगळ्यात रोमँटिक बीचपैकी एक आहे. हे ठिकाण दोन डोंगराच्या मधोमध पालोलेमच्या उत्तर भागात आहे. हे गोव्यातील सर्वात कमी लोकप्रिय बीचपैकी एक आहे, जे मुख्यत्त्वे परदेशी आणि सुंदर पक्षांसाठी ओळखले जाते.

गोव्यात फिरण्यासाठी किती खर्च येतो?

हे तुमच्यावर अवलंबून आहे की, तुम्ही किती खर्च कराल. गोव्यात फिरताना परिवहनचा खर्च प्रतिदिन २५० ते ५०० रुपये येतो. तर प्रतिव्यक्ती राहण्यासाठी एका दिवसाला ५०० ते ७०० खर्च येतो. तर खाण्यासाठी प्रतिदिन ५०० ते ६०० रुपये खर्च येतो.

किती दिवसांत फिरणे होईल?

गोवा राज्य लहान असल्याने इथं फिरण्यासाठी चार दिवस पुरेसे आहेत. तसेच इथं खरेदीसाठीही चांगली ठिकाणे आहेत

loading image