Mhwakada Waterfall : डोंगर कपारीतील धबधबे झाले प्रवाहित; 'हा' धबधबा पर्यटकांना करतोय आकर्षित

डोंगर कपारीतील धबधबे पर्यटकांना आकर्षित केल्याशिवाय राहत नाहीत
Mhwakada waterfall in Shirala
Mhwakada waterfall in Shiralaesakal
Summary

डोंगर कपारीतील धबधबे प्रवाहित झाले आहेत. आता तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने अनेक पर्यटकांची ओढ या धबधब्याकडे लागली आहे.

शिराळा : येथील तालुक्यात (Shirala) गेले तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी जमिनीतून अंतर्गत प्रवाहित झालेल्या पाण्याच्या उमाळ्यामुळे डोंगर कपारीतील धबधबे पर्यटकांना आकर्षित केल्याशिवाय राहत नाहीत. अनेक धबधबे अजून ही डोंगराच्या कुशीत दडलेले आहेत.

त्या पैकीच एक धबधबा म्हणजे किनरेवाडी येथील म्हवकडा धबधबा. सध्या हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनू लागला आहे. शिराळा तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला तरी दमदार झाल्याने धरण, ल. पा. तलाव व पाझर तलाव यांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

Mhwakada waterfall in Shirala
Anuskura Ghat : घाटाच्या पायथ्याशी अवतरला स्वर्ग! पावसाळ्यात खुललं 'अणुस्कुरा'चं सौंदर्य, पर्यटकांसाठी मेजवानी

डोंगर कपारीतील धबधबे प्रवाहित झाले आहेत. आता तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने अनेक पर्यटकांची ओढ या धबधब्याकडे लागली आहे अनेक पर्यटकांची पावले या धबधब्याकडे वळू लागली आहेत. किनरेवाडी ते ढाणकेवाडी दरम्यान असणाऱ्या पुलापर्यंत वाहनाने जाता येते. त्या ठिकाणी वाहने उभी करून धबधब्याकडे पायवाटेने दोन किलोमीटर अंतर चालत जावे लागते.

Mhwakada waterfall in Shirala
Satara Rain : दिलासा नाहीच! पश्चिमेकडे उघडीप, पूर्व भाग दुष्काळाच्या छायेत; जिल्ह्यात 76 टक्केच पाऊस

शिराळा तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने चांदोली धरणात २०५६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. २४ तासांत चांदोलीत ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विद्युतनिर्मितीतून १००० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत घट झाली आहे. वारणा नदीचे पाणी पात्रात गेले आहे. धरणाची पाणीपातळी ६२२.०० मीटर आहे. पाणीसाठा ८३३.९४९ द.ल.घ.मी. असून २९.४९ टीएमसी म्हणजे ८५.७१ टक्के पाणीसाठा आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com