सुवर्णमयी इतिहासातील पेशवेकाळाचा साक्षीदार मोजतोय अखेरची घटका

 बेलापूर किल्ला
बेलापूर किल्लाGoogle

सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. किल्ल्यांमुळे मराठ्यांच्या मुलुखांचे साम्राज्य टिकून होते. सागरी आरमारांना सुरक्षा देण्याचे काम किल्ले करायचे. पनवेल, उरणपासून वसईपर्यंतच्या आरमारांवर लक्ष ठेवण्याचे महत्त्वाचे काम बेलापूरच्या (Belapur) किल्ल्यातून होत असे. आज तोच किल्ला दुर्लक्ष होत असल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सुवर्णमयी इतिहासातील अनेक चांगले-वाईट दिवस पाहिलेला आणि पेशवेकाळातही नवी मुंबईचे (Mumbai) महत्त्व अधोरेखित करणारा हा साक्षीदार आता अखेरची घटका मोजत आहे. या किल्ल्याला खऱ्या अर्थाने नवी उजाळी देण्याची गरज आहे.

इतिहास संशोधकांच्या मते १५७० च्या दशकात भुईकोट प्रकारातील हा किल्ला एका टेकडीवर तयार करण्यात आला. जंजिरा किल्ला तयार करणाऱ्या सिद्दी जोहर याने हा किल्ला बांधल्याच्या नोंदी इतिहासात सापडतात. पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रजांची अशा विविध साम्राज्यांची सत्ता या किल्ल्याने पाहिली आहे. १५७० च्या काळात पोर्तुगीजांकडून हा प्रदेश जेव्हा सिद्दीने ताब्यात घेतला, तेव्हा पनवेलच्या बंदरावर येणाऱ्या मालवाहू जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी नवी मुंबईच्या खाडीकिनारी या टेकडीवर किल्ल्याची टेहाळणीकरता निर्मिती केली. त्यानंतरच्या काळात पोर्तुगिजांनी पुन्हा बेलापूर किल्ला सिद्दीकडून ताब्यात घेतला. त्या काळातील परिसराला शाबाज बोलले जायचे. पुढे याच शब्दावरून शहाबाज नावाचे गाव तयार झाले.

 बेलापूर किल्ला
अमृत योजनेत आप्पाचीवाडीसह 'या' गावांचा समावेश ; जोल्लेंची माहिती

१७३३ मध्ये कोकणाच्या स्वारीवर आलेल्या पेशवे साम्राजाचे चिमाजी आप्पा वसईला जाताना बेलापूरचा किल्ला लढवला. पोर्तुगीजांकडून चिमाजी यांनी हा किल्ला जिंकून मराठा साम्राज्यात दाखल केला. त्या वेळेस किल्ला जिंकल्यास जवळच्या अमृतेश्वर मंदिरात बेलाच्या पानांचा हार घालेन, असा पन चिमाजी आप्पा यांच्या सैन्याने केला होता. त्यानुसार तेव्हाच या किल्ल्याला बेलापूर किल्ला असे नामकरण करण्यात आले. १८१७ पर्यंत या किल्ल्यांवर मराठ्यांचे राज्य होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com