Propose Day 2023 : GF कडून होकार हवा असेल तर याच ठिकाणी करा प्रपोज!

तिला काहीतरी हटके करून इंप्रेस करण्याच्या नादात सर्वजण असतात
Propose Day 2023
Propose Day 2023esakal

सध्या सोशल मिडियावर व्हॅलेंटाईन विकची धुम सुरू आहे. आज प्रपोज डे असून तरूणाईत हा दिवस व्हॅलेंटाईनची प्रीपरेशन म्हणून पाहिला जातो. आजच्या दिवशी आवडणाऱ्या त्याला किंवा तिला मनातल्या भावना सांगितल्या जातात. त्यासाठी आजचा दिवस स्पेशल बनवला जातो.

एखाद्या तरूणीला प्रपोज करताना तरूण अधिक काळजी घेतात. तिला काहीतरी हटके करून इंप्रेस करण्याच्या नादात सर्वजण असतात. त्यामूळे प्रपोज करण्यासाठी बेस्ट लोकेशन शोधले जाते. मित्रांकडे चौकशी केली जाते. एखादे कॅफे किंवा रेस्टॉरंटऐवजी पर्यटनस्थळाचा विचार केला जातो.

कॉलेज गोईंग तरूणांसाठी स्वस्तात पण भारी प्रपोज ठरेल असे काहीतरी शोधत असतात. तूम्ही जर पुण्यात असाल तर पार्टनरला प्रपोज करण्यासाठी जवळची काही खास ठिकाणे पाहुयात.

Propose Day 2023
Propose Day : समोरच्याला Hurt न करता कसा द्याल नकार

पुणे शहरातील स्वारगेट येथे सारसबाग आहे. हिरव्या गार झाडे आणि फुलझाडांनी नटलेली ही बाग पुणे शहराची शान आहे. बागेत एक छोटे तळे असून त्यामध्ये एक गणपतीचे मंदिर आहे. या बागेत व्यायाम आणि बोटींगसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. या तलावात बोटींगचा आनंद घेत तूम्ही प्रपोज करू शकता.

शनिवार वाडा म्हणजे पुणे शहरातील एक ऐतिहासिक वास्तू. शनिवार वाडा ही पेशवेकालीन वास्तू आहे. या ठिकाणी पेशव्यांचे निवासस्थान होते. पहिले बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली हा राजवाडा बांधला होता. त्या काळी या वाडा पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक मानले जायचा. आजही तो पुण्याच्या सौदर्यात भर घालत आहे. या ठिकाणी तूम्ही आवडत्या व्यक्तीला प्रपोज करू शकता.

Propose Day 2023
Propose Day Horoscope : राशीनुसार अशा प्रकारे प्रपोज करा, होकार मिळालाच समजा

पुणे शहरात सकाळी फिरायला जाण्यासाठी पर्वती हे ठिकाण नक्कीच उत्तम आहे. पर्वती ही छोटेखानी टेकडी आहे ज्यावर अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. पुण्यात मॉर्निंगवॉकसाठी पर्वतीवर जाण्याची पद्धत आहे. इथे सुट्टीच्या दिवशी लोकांची वर्दळ असते. या ठिकाणीही तूम्ही तूमचे प्रपोजल खास बनवू शकता.

कात्रजमधील राजीव गांधी सर्पोद्यान जवळजवळ 130 किमीवर पसरलेले आहे. या उद्यानामध्ये विविध जातीचे सर्प आणि जंगलातील प्राणीसंग्रहालय आहे. या ठिकाणीही तूम्ही तूमचं प्रेम व्यक्त करू शकता.

Propose Day 2023
Propose Day : प्रपोज केलंय अन् समोरच्याने थेट नकार दिला? मग काय कराल?

पुण्यातील जुन्नर गावाला निसर्गाचे अनमोल वरदान लाभले आहे. या गावात लेण्यांचा ऐतिहासिक वारसा पहायला मिळतो. लेण्यामध्ये या गावाचा प्रथम क्रमांक लागतो. जुन्नर तालुक्यात जवळ जवळ 11 ठिकाणी विविध समुहामध्ये ही लेणी कोरलेली आहेत. या ऐतिसाहीक लेण्यांना साक्षी माणून तूम्ही जोडीदाराला प्रपोज करू शकता.

Propose Day 2023
Propose Day 2023 : एका ढोलाच्या मदतीने राजकुमारीने राजकुमाराला परत मिळवले!

पुण्यातील मुळा नदीवर वसलेलं सुंदर धरण म्हणजे मुळशी धरण. पुणे शहरात या धरणातील पाण्याचा पूरवठा केला जातो. सह्याद्रीच्या डोंगररांगा निसर्गरम्य घाट आणि दऱ्या, चहूबाजूने पसरलेलली हिरवळ, पक्षी आणि  प्राणी पाहण्यासाठी या धरणाच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे. 

Propose Day 2023
Propose Day 2023 : प्रेम करावं तर नेताजी आणि एमिलीसारखं; दुरावा असूनही शेवटपर्यंत निभावलं जाणारं!

पुण्यातील शिवाजी नगरमध्ये वसलेलं हे एक शिवालय आहे. या मंदिरामध्ये शिवालय राजवटीच्या खुणा दर्शवणाऱ्या सुंदर लेण्या आहेत. ही लेणी जमिनीखाली खोदण्यात आलेली आहेत.

Propose Day 2023
Nature Tourism : निसर्गाची वाट, वरंधा घाट

यासह पुण्यापासून जवळच असलेली लोणावळा, खंडाळा, वाई, लवासा सिटी येथेही तूम्ही जाण्याचा प्लॅन करू शकता. कारण प्रपोज आयुष्यात एकदाच केला जातो. रिझेक्शन मिळाले तर दुसऱ्या प्रपोजरचा विचार केला जातो. त्यामूळे हे प्रपोजर खास बनवण्यासाठी थोडे कष्ट घ्या. आणि या ठिकाणी जाऊवच प्रपोज करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com