

ranchi pahadi temple independence day flag
esakal
रांची रेल्वे स्टेशनपासून सुमारे ७ किलोमीटर अंतरावर किशोरगंज परिसरातील पहाडी मंदिर धार्मिक स्थळासोबतच झारखंडच्या इतिहासाची महत्त्वाची साक्ष देणारे ठिकाण आहे. या टेकडीचा भूगर्भीय इतिहास तब्बल ६५० ते ९०० दशलक्ष वर्षे जुना असल्याचे भूगर्भशास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे ही टेकडी हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचे सांगितले जाते.
रांची विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. नितीश प्रियदर्शी यांच्या मते, या टेकडीच्या निर्मितीचा काळ ६५० ते ९०० दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे. येथे आढळणारे 'खाँडालाइट' खडक या प्राचीन भूगर्भीय इतिहासाची साक्ष देतात.