esakal | माता सीतेच्या शापाने रावेरीत पिकत नाही गहू; वाचा संतांच्या पुण्यभूमीबद्दल
sakal

बोलून बातमी शोधा

माता सीतेच्या शापाने रावेरीत पिकत नाही गहू; वाचा संतांच्या पुण्यभूमीबद्दल

माता सीतेच्या शापाने रावेरीत पिकत नाही गहू; वाचा संतांच्या पुण्यभूमीबद्दल

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव तालुका (Ralegaon taluka) अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. त्यामुळे या तालुक्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. रावेरी येथे प्रसिद्घ सीतामातेचे मंदिर (Temple of Sitamata) आहे. आजनसरा येथील भोजाजी महाराजांचे मंदिर विदर्भात प्रसिद्ध आहे. याशिवाय कापशी येथील नानाजी महाराजांची यात्राही प्रसिद्घ आहे. या तिन्ही ठिकाणी भाविकांची प्रचंड वर्दळ असते. (Raver taluka of Yavatmal district is a holy land of saints)

नानाजी महाराज परिसरात संत म्हणून प्रसिद्ध होते. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमारेषेवरून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या तीरावर हे भव्य मंदिर आहे. या मंदिरात नानाजी महाराज मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. याशिवाय नानाजी महाराजांची व त्यांच्या पत्नीची समाधी व मूर्तीसुद्घा आहे. येथे रथसप्तमीला मोठी यात्रा भरते. रात्री बाराला तीसुद्धा नदीपात्रातील एक विशिष्ट खडकावर २२ भजनी मंडळासह दहीहंडी फोडली जाणारी ही एकमेव यात्रा असावी असे जाणकार सांगतात. येथेही वर्षभर पानग्याचे व इतरही स्वयंपाक होतात. मंदिर परिसर शांत व सुंदर आहे.

हेही वाचा: वर्धेत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; कोरोनावर केली होती मात

विदर्भासह मध्यप्रदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत भोजाजी महाराज मंदिर आजनसरा येथे आहे. सन १८०० मध्ये भोजाजी महाराजांचा जन्म आजनसरा येथे झाला. पुढे ते एक संत व सिद्धपुरुष म्हणून नावारूपास आले. महाराजांच्या ठिकाणी धर्मभेद व जातिभेद नव्हता. सर्वधर्म समभाव होता. महाराज न चुकता दरवर्षी पंढरीची वारी करायचे. त्यालाच अनुसरून आजही दर बुधवारी व रविवारी पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू असतो. इतरही दिवशी मंदिरात स्वयंपाक सुरूच असतात. महाराजांनी आपल्या कार्यकाळात कोड व महारोगासारखे रोग केवळ तीर्थद्वारे दुरुस्त केल्याचे सांगितले जाते.

राळेगावच्या दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रावेरी येथे देशातील एकमेव सीता मंदिर आहे. रावेरी हा दंडकारण्याचा भाग म्हणून ओळखला जातो. राज्याभिषेकानंतर सीतेला वनवास झाला त्यावेळी ती रावेरी येथे होती. या गावातच लाव-कुशाचा जन्म झाला तसेच लव-कुश व हनुमानजी यांच्यात अश्वमेघाच्या घोड्यावरून युद्ध झाले असे गावकरी मानतात.

येथेच विदर्भात प्रसिद्ध असलेल्या १३ फुटांची हनुमानाची मूर्ती असलेले हनुमानजीचे मंदिर आहे. वाल्मिकी ऋषींची समधीसुद्घा येथेच आहे. रावेरीतून वाहणारी रामगंगा ही रामयणातील तमसा नदी असून ती येथून वाहते. लव-कुशाचा जन्म झाल्यावर सीता गहू मगण्यांसाठी गेली असता गावकऱ्यांनी हाकलून दिले. यामुळे तिने गावकऱ्यांना शाप दिला. तेव्हापासून अलीकडील काळापर्यंत रावेरी येथे गहू पिकत नाही. अशी या मंदिराची आख्यायिका आहे. सीता मंदिरात महादेवाची मोठी पिंड असून तिथे सीतेची न्हाणी आहे. तसेच न्हाणी घरात नदीचे पाणी ज्या गोमुखातून पडते ते गोमखही आहे.

हेही वाचा: बापासाठी अखेरचा ठरला मुलाचा वाढदिवस, तलावात बुडून बाप अन् लेकाचा मृत्यू

हनुमानाची १३ फूट उंच मूर्ती

हनुमानाचे मोठे मंदिर असून, त्यात बांधलेल्या अवस्थेतील हनुमानाची १३ फूट उंच मूर्ती आहे. मंदिर परिसर हा अतिशय सुंदर असून हनुमान जयंती व सीतानावमीला येथे मोठे कार्यक्रम होतात. बाराही महिने येथे नागरिक दर्शनासाठी येतात व स्वयंपाक करतात. रावेरीला आता पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. रावेरी हे मोठे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे.

भोजाजी महाराजांना हवी पुरणपोळी

भोजाजी महाराज समाधिस्त झाल्यावर काही वर्षांनी मंदिराचे बांधकाम झाले. मंदिरात महारांजची मूर्ती बसविण्यात आली आहे. मंदिर मोठे असून आजूबाजूचा परिसरही प्रशस्त आहे. येथे सर्व जातीधर्माचे, पंथाचे, गरीब, श्रीमंत, अशिक्षित, सुशिक्षित सर्वच मंडळी नवस फेडण्यासाठी येतात. अट फक्त एकच की स्वयंपाक पुरणपोळीचा हवा. येथे रविवारी व बुधवारी पाच हजारावर स्वयंपाक असतात. यादिवशी स्वयंपाकासाठी मंदिर परिसरसुद्धा कमी पडतो हे उल्लेखनीय. येथे पुरण दळण्यासाठी मंदिर कमिटीने अनेक चक्क्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

(Raver taluka of Yavatmal district is a holy land of saints)