स्नोफॉल बघायचा? आपल्या देशातही आहे चांगले ठिकाण

जम्मू काश्मीरपासून ईशान्येपर्यंत अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे दरवर्षी हिवाळ्यात बर्फवृष्टी पाहायला मिळते
snowfall
snowfall

सद्य हिवाळ्याचे (Winter) दिवस सुरू आहे. थंडीत बर्फात फिरायला जाण्याचा आनंद वेगळाच असतो. कापसासारखा भुरुभुरु पडणारा पांढराशुभ्र बर्फ (Snowfall) सर्वांना आवडतो. भारतात बर्फवृष्टी पाहण्यासाठी डिसेंबर आणि जानेवारी हा सर्वोत्तम काळ आहे. उत्तराखंड (Uttarakhand), जम्मू काश्मीरपासून (Jammu and Kashmir) ईशान्येपर्यंत अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे दरवर्षी हिवाळ्यात बर्फवृष्टी (Snowfall) पाहायला मिळते.

काश्मीरमधील गुलमर्ग, सोनमर्ग पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग, हिमाचल प्रदेशातील मनाली, मसुरी ही बर्फवृष्टी होणारी लोकप्रिय ठिकाणे सोडून भारतात अशी अनेक नयनरम्य ठिकाणे आहेत जी तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडतील. आम्ही तुम्हाला अशाच सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. येथे जाऊन तुम्ही हिमवर्षावाचा आनंद घेऊ शकता.

snowfall
आजीचे अनैतिक संबंध; अडसर ठरणाऱ्या ३ वर्षीय नातीची हत्या

सोनमर्ग हे बर्फाचे नंदनवन

सोनमर्ग हे हिवाळ्यात बर्फाचे नंदनवन आहे. हिवाळ्यात बर्फाच्या सुंदर चादरीने झाकलेले असते. हे स्थळ पाहण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे आहे. ट्रेकिंग आणि रिव्हर राफ्टिंगसाठीही हे उत्तम ठिकाण आहे. तुम्ही उन्हाळ्यात सोनमर्गला जात असाल तर ‘थाजीवास ग्लेशियर’ला भेट द्या.

होमकुंड साहिब, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स

हेमकुंड आणि खोऱ्यातील बर्फवृष्टीसाठी ऑक्टोबर आणि डिसेंबरच्या सुरुवात ही योग्य वेळ आहे. समुद्रसपाटीपासून ४,६०० मीटर उंचीवर असलेला येथील गुरुद्वारा, शिखांचे १०वे गुरू गुरू गोविंद सिंग यांना समर्पित आहे. परिसरातील हवामान पाहता त्या ठिकाणी पोहोचणे ही काही सोपी गोष्ट नाही. पण अनुभव छान आहे.

औली हे सर्वोत्तम बर्फाचे ठिकाण

औली हे बर्फवृष्टी पाहण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. सुरुवातीला ते प्रसिद्ध नव्हते, फक्त एक लहान ऑफबीट हिल स्टेशन मानले जात होते. ‘नंदा देवी, मन पर्वत आणि कामत कामेत’ या हिमालयातील उंच, उंच पर्वतशिखरांच्या काही सुंदर विहंगम दृश्यांमुळे आणि स्कीइंगमुळे ते प्रकाश झोतात आले. औली हे भारतातील हिमालयातील मंत्रमुग्ध करणारी दृश्ये देणारे सर्वोत्तम बर्फाचे ठिकाण आहे.

snowfall
सहा दिवसांची झुंज संपली; जखमी मुलीचा नागपुरात मृत्यू

नैनितालला अफाट निसर्ग सौंदर्य लाभले

उत्तराखंड हे राज्य बर्फाचे माहेरघर म्हटलं तरी चालेल. उत्तराखंडमध्ये चोपटा, औली याबरोबरच अनेक तळ्यांचे नगर नैनिताल हे सुद्धा बर्फवृष्टीसाठी आणि तळ्यातील बोटिंग साथी प्रसिद्ध आहे. नैनितालला अफाट निसर्ग सौंदर्य लाभले आहे. इथल्या तलावांच्या संख्येमुळे त्याला ‘भारताचा तलावांचा जिल्हा’ अशी उपमा दिली गेली आहे. नैनितालमध्ये हिमवर्षाव पाहण्यासाठी असलेल्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी ‘स्नोपॉइंट’ सर्वांत उत्तम जागा आहे.

लंबसिंगी

विशाखापट्टणमच्या चिंतापल्ली मंडळाच्या पूर्व घाटात वसलेले लंबसिंगी हे आंध्र प्रदेशातील एक छोटेसे गाव आहे. या भागात बर्फवृष्टी पाहायची असेल तर नोव्हेंबर ते जानेवारी हा साधारणपणे भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. जरी बर्फवृष्टी दरवर्षी होत नसली तरी हे गाव निसर्गसौंदर्य, धुक्याच्या चादरीत लपलेल्या सकाळी आणि परिसरातील धबधब्यांसाठी देखील ओळखले जाते.

चादर ट्रेक-लडाख

लेह-लडाख परिसर प्रचंड बर्फवृष्टीमुळे हिवाळ्यात बंद राहत असला तरी चादर ट्रेक हा प्रत्येक भटक्या आणि त्रेकर लोकांच्या यादीत खूप वरच्या क्रमांकावर आहे. गोठलेली ‘झांस्कर’ नदी ओलांडून पुढे जाताना नऊ दिवसांचा हा एक आव्हानात्मक ट्रेक आहे. जानेवारीपासून अनेक तुकड्यांमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारीपर्यंत तर कधी कधी अगदी मार्चपर्यंत चालू राहतो.

पटनीटॉप

जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील पटनीटॉप हे हिमालयाच्या ‘शिवालिक’ टेकड्यांमध्ये वसलेले हिल स्टेशन आहे. पाइन, देवदार वृक्षाची जंगले, जवळून वाहणारी ‘चिनाब नदी’ आणि मनमोहक निसर्ग असलेले पटनीटॉप हे छोटेसे गाव भारतातील सर्वांत शांत बर्फवृष्टीच्या ठिकाणांपैकी एक समजले जाते. पॅराग्लायडिंग, स्नोबोर्डिंग आणि स्कीइंग साठी हे ठिकाण म्हणजे सर्वोत्तम ठिकाण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com