आता बिंधास्त फिरा; देशातील ‘या’ ठिकाणी महिला करु शकतात सोलो ट्रीप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 देशातील ‘या’ ठिकाणी महिला करु शकतात सोलो ट्रीप

देशातील ‘या’ ठिकाणी महिला करु शकतात सोलो ट्रीप

सोलो ट्रीप (solo trips) करणं हा अनेकांचा छंद असतो. आपल्याला हव्या त्या ठिकाणी, वाट्टेल तितका वेळ निवांत बसून आपल्याच विचारांमध्ये गुंतून जाणं काहींना विशेष आवडत असतं. त्यामुळे कित्येक जण सोलो ट्रीप करण्याला पसंती देतात. यात स्त्रियादेखील आघाडीवर आहेत. आजवर अशा कित्येक स्त्रिया आहेत ज्या बिंधास्तपणे सोलो ट्रीप करण्यासाठी बाहेर पडतात आणि फिरण्याचा मनमुराद आनंद घेतात.परंतु गेल्या काही वर्षांमध्ये महिलांसोबत घडलेल्या घटनांवर एक नजर टाकली तर स्त्री असुरक्षित असल्याची जाणीव होते. त्यामुळे बऱ्याच वेळा मुलींना, स्त्रियांना सोलो ट्रीपला पाठविण्यासाठी घरातले मनाई करतात. परंतु भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जेथे महिला सोलो ट्रीपला जाऊ शकतात तेदेखील अगदी सुरक्षितरित्या. चला तर मग पाहुयात भारतात महिला करु शकतील अशी सोलो ट्रीपची ठिकाणं.(some cities in india that are safe enough for womens solo trips)

हेही वाचा: जबरा फॅन! रॉकस्टारच्या ६ केसांसाठी मोजले 10 लाख

१. जयपूर –

पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरला कायमच पर्यटकांची पसंती मिळते. जयपूरमध्ये पर्यटनासाठी अनेक ठिकाणं असून यातील अशी काही ठिकाणं आहेत जेथे स्त्रिया बिंधास्तपणे एकट्याने वावर करु शकतात. यात हवा महल, जल महल, नाहरगढचा किल्ला, आमेरचा किल्ला, जंतर-मंतर, सिटी पॅलेस, गल्ताजी, बिरला मंदिर, गढ गणेश मंदिर, जयगढचा किल्ला ही लोकप्रिय पर्यटनाची स्थळं आहेत. येथे स्त्रिया नक्कीच एकट्या जाऊ शकतात.

२. हम्पी –

कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातलं हे एक गाव आहे. हे गाव तुंगभद्रा नदीकाठी वसलं असून हे गाव प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे नगर होते. हम्पी येथील श्री विरुपाक्ष मंदिर हे प्रसिद्ध आहे. युनेस्कोद्वारे हम्पी या गावाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी महिला सोलो ट्रीप करु शकतात.

हेही वाचा: प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये राहताय?

३. ऋषिकेश –

उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश हे महिलांच्या सोलो ट्रीपसाठी अत्यंत योग्य ठिकाण आहे. मोठमोठ्या पर्वतरांगा, खळखळत वाहणारी गंगा नदी येथील आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. तसंच लक्ष्मण झुला, त्रिवेणी घाट, स्वर्ग आश्रम, रामझूला, परमार्थ निकेतन घाट, नीलकंठ महादेव मंदिर, भरत मंदिर, कैलाश निकेतन मंदिर, वशिष्ठ गुफा, गीता भवन, मोहनचट्टी ही पाहण्यासारखी ठिकाणं आहेत. ऋषिकेशला रेल्वेमार्ग, हवाईमार्ग आणि रस्तेमार्गाने जाता येऊ शकतं.

४. पदुच्चेरी –

ज्या महिलांना अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची आवड आहे. त्या महिलांनी पदुच्चेरीला नक्कीच भेट द्यायला हवी. येथे अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी अनेक ठिकाणं आहे. सोबतच येथे फिरण्यासाठी सुंदर ठिकाणं आणि खाण्याचे एकाहून एक सरस पदार्थ मिळतात. त्यामुळे ज्या महिला खवैय्या आहेत आणि ज्यांना अॅडव्हेंचर अनुभव घ्यायचा आहे त्यांनी या ठिकाणी नक्कीच भेट द्या.

५. झिरो व्हॅली –

झिरो व्हॅलीला पृथ्वीवरील स्वर्गदेखील म्हटलं जातं. अरुणाचल प्रदेशमध्ये ही व्हॅली असून महिलांसाठी सोलो ट्रीप करण्यसाठी ही अत्यंत सुंदर जागा आहे.

loading image
go to top