ओखला पक्षी अभयारण्यात भरला पक्ष्यांचा मेळा; एकदा भेट द्याच

Winter Tourism | Okhla Bird Sanctuary: हिवाळा (winter) सुरू झाल्याने ओखला पक्षी अभयारण्यात परदेशी पक्ष्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
Okhla Bird Sanctuary
Okhla Bird SanctuaryEsakal

ओखला पक्षी अभयारण्य | Okhla Bird Sanctuary:

हिवाळा (winter) सुरू झाल्याने ओखला पक्षी अभयारण्यात (Okhla Bird Sanctuary) परदेशी पक्ष्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. या दिवसात पाच हजारांहून अधिक पक्ष्यांची उपस्थिती असल्याचे वनविभागाकडून (Forest department) सांगण्यात आले. दिल्ली (Delhi)- उत्तरप्रदेश (Uttar Predesh) सीमेवरील या पक्षी अभयारण्यामध्ये अनेक प्रजातींच्या पक्ष्यांची (Species of Birds) संख्या 300 हून अधिक आहे.

Okhla Bird Sanctuary
पिळदार मिशांचा पक्षी कधी पाहिलाय? 'या' पक्षाचा आहे रुबाबच न्यारा

ओखला पक्षी अभयारण्यात हिवाळ्यात देश-विदेशातील पक्षी (Birds) मोठ्या संख्येने येतात. अति थंडीतील प्रदेशामधून (Cold places) पक्ष्यांना हे पक्षी भारतामध्ये (India) स्थलांतरीत होतात. साधारणपणे ऑक्टोबरच्या मध्यापासून हे पक्षी येथे येण्यास सुरुवात करतात आणि 15 मार्चच्या सुमारास निघून जातात. वन अधिकारी (Forest officer) अरविंद मिश्रा यांनी सांगितले की, जास्तीक जास्त पक्षी ओखला पक्षी अभयारण्यात यावेत यासाठी पक्ष्यांसाठी अनुकूल वातावरण तयार केले आहे. त्यांच्यासाठी पाण्याच्या सोयीसोबतच पक्ष्यांना बसण्यासाठी बांबू लावण्यासह तलावाची स्वच्छता करण्यात आली आहे.

Okhla Bird Sanctuary
वातावरणीय बदलामुळे हिमालयातील पक्षी अधिवास संकटात

या प्रजाती पाहण्याची संधी (Opportunity to see this species)-

वन वनसंरक्षक सांगतात की, सर्पेंट ईगल (Serpent Eagle- घारीची एक प्रजाती), कॉमन किंग फिशर (Common King Fisher), व्हाइट थ्रोडेट किंगफिशर (White Throated Kingfisher), ओरिएंटल डार्टर्स (Oriental Darters) , ब्लिथ्स रीड वाल्बर (Blyth's Reed Walber), लेसर व्हाइट थ्रोट (Lesser White Throat), प्लम हेडेड पाराकीत (Plum Headed Parakeet), टू ग्रेटेड स्पॉटेड ईगल (Two Grated Spotted Eagle), रूडी शेलडक (Rudy Shelduck), ब्लैड हैडेड आईबिस (Blade Headed Ibis), शिकरा (Shikara), ग्रे हॉर्नबिल (Gray Hornbill), पाईड किंगफिशर (Pied Kingfisher), स्पॉट बिल्ड डक (Spot Build Duck), रिवर लैपिंग (River Lapping), रेड विशकर बुलबुल (Red Vishkar Bulbul) , कॉपर स्मिथ बारबेट (Copper Smith Barbet) , यूरेशियन हॉबी (Eurasian Hobby) इत्यादी प्रजातींचे पक्षी पाहता येत येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com