esakal | वातावरणीय बदलामुळे हिमालयातील पक्षी अधिवास संकटात
sakal

बोलून बातमी शोधा

वातावरणीय बदलामुळे हिमालयातील पक्षी अधिवास संकटात

वातावरणीय बदलामुळे हिमालयातील पक्षी अधिवास संकटात

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- जितेंद्र विसपुते औरंगाबाद : ‘‘वातावरण बदलाचा विपरीत परिणाम हिमालयातील पक्ष्यांवरही होत आहे. जवळपास पाचशे पक्ष्यांच्या प्रजाती व त्यांचा अधिवास यामुळे संकट सापडला असून तातडीने उपाययोजना आणि संवर्धन कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे,’’ असे मत पक्षी अभ्यासक आणि संशोधक डॉ.साहस शरदराव बर्वे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

हेही वाचा: पोळ्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

डॉ.साहस बर्वे २०१७ पासून अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. ते मूळचे मुलुंड (मुंबई) येथील रहिवासी आहेत. तेथील प्रसिद्ध स्मिथसोनियन म्युझिअम ऑफ नॅचरल हिस्टरी येथे ते वर्ष २०१९ पासून हिमालयातील पक्षी अधिवास यावर संशोधन करीत आहेत. डोंगररांगेत पाच हजार फुटांपासून वर राहणारे पक्षी थंडीत नेमके कसे अनुकूलन साधतात? हा त्यांच्या संशोधनाचा मूळ विषय आहे.

जगभरात पक्ष्यांच्या दहा हजार ३०० प्रजाती आहेत. त्यापैकी भारतात एक हजार ८९० प्रजाती आढळतात. स्मिथसोनियन म्युझियमच्या पक्षीविज्ञानशास्त्र विभागात जगभरातील पक्ष्यांचे सहा लाख मृत पक्ष्यांचे नमुने आहेत. पैकी पाच हजार नमुने हिमालयीन पक्ष्यांचे आहेत. हिमालयीन पक्ष्यांचे दोन हजार ४९ नमुने बर्वे अभ्यासत आहेत.

हेही वाचा: सहा जणांनी काढले बनावट जात प्रमाणपत्र

‘‘वातावरणातील बदलाचा फटका हिमालयातील पक्ष्यांना बसत आहे. बरेच पक्षी हिमालयात केवळ अंडी घालण्यासाठी येतात. यानंतर इतरत्र ते स्थलांतर करतात. त्यामुळे हिमालयातील जैवविविधतेच्या संवर्धनाची गरज आहे. विकासकामे पर्यावरणपूरक असली पाहिजे. हरितगृह वायूचे हवेतील प्रमाण कमी करणे आवश्यक असून यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेतली पाहिजे,’’ असे डॉ. बर्वे यांनी सांगितले.

जायकवाडीवरही करणार अभ्यास

मराठवाड्यातील जायकवाडी अभयारण्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी दरवर्षी येत असतात. यात काही प्रजाती या हिमालयातूनही येत असतात. मोठे पक्षी वैभव असलेल्या या अभयारण्यातील पक्ष्यांच्या अधिवासाचा अभ्यास करण्याचा विचार असल्याचे डॉ.बर्वे यांना सांगितले.

हिमालयातील पक्ष्यांच्या या प्रजाती धोक्यात

व्हाइट थ्रोटेड टीट, ब्लॅक थ्रोटेड टीट, गोल्ड क्रेस्ट, व्हाइट टेल नटहॅट, रोजफिंच, ग्रोसबीक, फिजंट, ब्लू फ्रॉन्टेड रेडस्टार्ट, क्रिमसन सनबर्ड, फायर फ्रॉन्टेड सेरीन, फुलवेट्टा, पॅरॉटबील, स्कारलेट फिंच, स्पेक्टॅकल्ड फिंच, रेडस्टार्ट, अल्पाईन ॲसेंटर, रोसी पीप्पिट, ब्लॅक रेडस्टार्ट, हिमालयीन ब्लू टेल, गोल्डन बुश रोबिन, ग्रे सायडेड बुश वार्ल्बेर, वेस्ट हिमालयीन बुश वार्ल्बेर, फायर टेल सनबर्ड, ग्रे क्रेस्टेड टीट, कोल टीट, व्हाइट ब्रोड फुलवेट्टा, स्पॉटेड लाफिंग थ्रश, अपलॅण्ड पीप्पिट, स्पॉट विंग रोज फिंच आदी जवळपास ५०० प्रजाती आज धोक्यात आहेत.

हेही वाचा: औरंगाबाद: तपोभूमी गोगाबाबा टेकडी

वातावरणीय बदलाचा फटका हिमालयातील पक्ष्यांनाही बसत आहे. हिमालयात बेमोसमी किंवा मोसमात अचानक काही दिवसांत जास्तीचा बर्फ पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. परिणामी येथील पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आहे. हिमालयात पाच हजार फुटांपेक्षा वर डोंगररांगेत राहणारे पक्षी वातावरणाशी कसे अनुकूलन साधतात? त्यांच्या पंखांचे यात किती योगदान असते? यावर अमेरिकेत मी संशोधन सुरू केले आहे. याचा निश्चितच भारताला मोठा फायदा होईल.

-डॉ. साहस बर्वे, संशोधक, अमेरिका

वातावरणीय बदल ही जागतिक समस्या असून याचे विपरीत परिणाम सजीवसृष्टीवर होत आहेत. हिमालयातील पक्ष्यांबद्दल डॉ. बर्वे यांनी हाती घेतलेले संशोधन साहसी असून जगभरात या विषयावर अत्यल्प संशोधने झालेली आहेत. आमच्या लॅबमध्ये पक्ष्यांची लाखो नमुने उपलब्ध आहेत. डॉ.बर्वे यांनी आमच्याकडे संग्रहित केलेले शंभर वर्षांपूर्वीचे नमुने अभ्यासले आहेत. त्यांचे संशोधन नक्कीच भारतासाठी फायदेशीर ठरेल.

-डॉ. कार्ला डव, प्रोग्रॅम मॅनेजर, बर्ड स्ट्राइक प्रोग्रॅम, स्मिथसोनियन म्यूझियम, अमेरिका.

loading image
go to top