Travelling Tips : ख्रिसमसनिमित्त फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग, पॅकिंग करताना फॉलो करा ‘या’ टिप्स

ख्रिसमस आणि न्यू इयरचे सेलिब्रेशन करण्यासाठी अनेक जण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.
Travelling Tips
Travelling Tipsesakal

Travelling Tips : अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला आहे. जगभरात दरवर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जगभरातील अनेक देशांमध्ये या ख्रिसमसची धामधूम पहायला मिळते.

या ख्रिसमस आणि न्यू इयरचे सेलिब्रेशन करण्यासाठी अनेक जण आपल्या फॅमिलीसोबत किंवा मित्र-मंडळींसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. फिरायला जाण्याचा प्लॅन झाल्यावर मग मोठ्या उत्साहात बॅग पॅकिंग केले जाते. हे बॅग पॅकिंग करताना मग काही चूका देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ट्रीपला जाताना तुम्ही लागणाऱ्या सर्व गोष्टी सोबत नेणे महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही बॅग पॅकिंग करताना काही टिप्स फॉलो करणे महत्वाचे ठरते. कोणत्या आहेत त्या टिप्स? ज्या तुम्ही बॅग पॅकिंग करताना फॉलो केल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊयात या टिप्स.

Travelling Tips
Christmas 2023 : ख्रिसमसच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग, ‘या’ हिलस्टेशन्सला नक्की भेट द्या

वातावरणानुसार कपडे सोबत घ्या

तुम्ही मित्रमंडळी किंवा फॅमिलीसोबत या ख्रिसमसला फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत असाल तर बॅग पॅकिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. जसे की, ज्या ठिकाणी ट्रीपला जाणार आहात, त्या ठिकाणच्या वातावरणानुसार तुमचे कपडे सोबत घ्या. अगदी खूप कपडे घेऊ नका मात्र, गरजेपुरते कपडे सोबत घ्या.

ख्रिसमसच्य दरम्यान वातावरणात चांगलीच थंडी असते. त्यामुळे, थंडीपासून बचाव करणारे कपडे, स्वेटर्स आणि जॅकेट्स सोबत घ्यायला विसरू नका.

ब्युटी प्रॉडक्ट्स

या दिवसांमध्ये वातावरणात थंडावा असतो. सध्या तर सर्वत्र प्रचंड कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे, या थंडीचा आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर ही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, खास त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही सोबत ब्युटी प्रॉडक्ट्स ठेवा.

यामध्ये मग बॉडी लोशन्स, क्रीम्स सोबत घ्या. त्यासोबतच, रोजच्या वापरातील तुमची मेकअप आणि स्किनकेअरची उत्पादने सोबत घ्यायला विसरू नका. यामुळे, त्वचेची काळजी घेतली जाईल.

औषधे

थंडीच्या दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात जाता, तेव्हा तेथील वातावरणाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. सर्दी, खोकला आणि ताप सारख्या समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे, या समस्यांवरील औषधे सोबत ठेवा.

टोपी आणि मोजे

थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही सोबत स्वेटर्स, जॅकेट्स आणि इतर कपडे घेतले असतील. मात्र, सोबत टोपी आणि मोजे घ्यायला अजिबात विसरू नका. खास करून हिल स्टेशनवर तुम्ही जाणार असाल तर तिथे थंड हवेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे, सोबत टोपी, मोजे, जॅकेट्स आणि ऊबदार कपडे पॅक करायला विसरू नका.

Travelling Tips
Christmas 2023 : यंदाच्या ख्रिसमस पार्टीला असा करा मेकअप लूक, दिसाल आकर्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com