आशियातील सर्वात उंच गणपती मुर्ती कुठे आहे ? तर..घ्या जाणून !

मुर्ती सुमारे 40 मीटर उंच असून ती पूर्णपणे पितळ धातूपासून बनलेली आहे
god ganpati
god ganpatigod ganpati

जळगाव ः तुम्हाला माहित आहे का, गणपतीची (Lord Ganesha) सर्वात उंच (highest) मुर्ती (idol) कोठे आहे ? महाराष्ट्रात (maharashtra) अथवा भारतात कोणत्या कोणत्या राज्यात असेल नक्की वाटेल. परंतू तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल कारण सर्वात उंच गणपतीची मुर्ती भारतात नाही. तर ती आशियातील (Asia) थायलंड (Thailand) देशात आहे. तर चला जाणून घेवू या स्थळाबद्दल...

(Thailand's tallest idol of Lord Ganesha in Asia)

god ganpati
धबधब्यांचा आनंद घ्यायचा तर मध्य प्रदेशात नक्की जा !

या शहरात आहे मुर्ती

गणपतीची सर्वात उंच मुर्ती थायलंड देथालीतल खलॉंग ख्वेन शहरात आहे. खलॉंग ख्वेन शहर चाचॉंग्सओ नावाने देखील ओळखले जाते. हे 'गणेशाचे शहर' म्हणून ओळख आहे. ही मूर्ती सुमारे 40 मीटर उंच असून ती पूर्णपणे पितळ धातूपासून बनलेली आहे. ही मूर्ती आंतरराष्ट्रीय उद्यानात असून येथे दरवर्षी लाखो भारतीय पर्यटक फिरायला येतात.

आठशे पितळ्याच्या तुकडे जोडून मुर्ती

थायलंड मधील ही गणपतीची मुर्ती शंभर वर्षापूर्वी तयार केली गेली असावी असा अंदाज येतो. परंतू तसे नसून ही मुर्ती 2012 मध्ये तयार करण्यात आली. हा पुतळा २००० ते २०१२ दरम्यान तयार करण्यात आला होता. या जागेचे प्रथम उद्यानात रूपांतर झाले आणि त्यानंतर काही वर्षांनी या उद्यानात गणेशाची मूर्ती बसविण्यात आली. 800 पेक्षा जास्त पितळाच्या तुकड्यांना जोडून या मुर्तीची निर्मिती केली गेली आहे.

अशी आहे रचना

गणपतीच्या या मुर्तीबद्दल असे म्हणतात की वादळ, भूकंपामुळे या मुर्तीचे नुकसान होवू नये यासाठी वेगळ्या पद्धतीने बांधकाम करण्यात आले आहे. गणेशाच्या हातात बरीच फळं पाहायला मिळतात. पोटावर साप आहे आणि मुखात एक लाडू आहे आणि पायावर एक उंदीर बसलेला आहे. थायलंड देशामध्ये नशिबाची आणि यशाची देवता म्हणून गणेशाची पूजा केली जाते.

god ganpati
पाणी टंचाईच्या वाडी-वस्त्यांसाठी 'स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना'

भारतातील उंच मुर्ती इंदौरला

गणपतीच्या उंच मुर्ती बाबत भारताबद्दल विचार करतांना इंदूरमध्ये स्थित गणपतीची 25 फूट उंच मूर्ती ही भारतातील सर्वात उंच मूर्ती आहे. 1875 मध्ये या मूर्तीची स्थापना केली गेली. तथापि, बरेच लोक असे मानतात की उत्तर प्रदेशच्या संभळ जिल्ह्यातही भारताची सर्वात उंच गणेश मूर्ती आहे. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर तो सामायिक करा आणि तत्सम अन्य लेख आपल्या स्वत: च्या वेबसाइट हरजिंदगीसह वाचण्यासाठी कनेक्ट करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com