esakal | निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचा! ईशान्य भारतातील गंगटोक शहर ठरेल बेस्ट डेस्टिनेशन
sakal

बोलून बातमी शोधा

Gangtok Best Tourist Places

तुम्ही ईशान्य भारतातील सिक्कीममधील सुंदर अशा गंगटोक शहर फिरायला जाणार असाल तर येथील निसर्ग स्थळांचा आनंद घ्या..

निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचा! ईशान्य भारतातील गंगटोक शहर ठरेल बेस्ट डेस्टिनेशन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सिक्कीम राज्यातील गंगटोक हे सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर आपल्या नैसर्गिक सौंदर्यांसाठी पूर्ण ईशान्य भारतात प्रसिद्ध आहे. येथे येणारा पर्यटक ताजेतवाना होऊन जातो. कांचनजुंगा पर्वत हे जगातील तिसरे सर्वांत मोठे पर्वत शिखर आहे. गंगटोकमध्ये तुम्हाला वाॅटर राफ्टिंग, त्सोमो झील, बान झाकरी, ताशी व्ह्यू पाॅईंट आणि सेव्हन सिस्टर्स वाॅटरफाॅलसारखे आकर्षक स्थळे फिरु शकता. मग उशीर कशाला तर चला गंगटोकचे ही पाच पर्यटनस्थळे फिरण्याचे नियोजन करा...नाथुला खिंड
कोणी सिक्कीम आणि गंगटोकला फिरायला जात असेल तर कोणीच हे स्थळ चुकवण्याचे टाळणार नाही. नाथु खिंड भारत आणि चीनच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पर्यटकांसाठी भेट देण्याचे प्रमुख ठिकाण आहे. जसे पंजाबमध्ये वाघा बाॅर्डर पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. तसेच ईशान्य भारतात भारत-चीन सीमा एक प्रेक्षणीय स्थळ आहे. येथे जाण्यासाठी तुम्हाला एका परमिटची गरज असते. ती सहज मिळून जाते. जर तुमच्या ट्रिपमध्ये भारत-चीनची झलक जरुर पाहावे. येथे त्सोंगमो तलावही पाहू शकता, जो नाथुला खिंडीजवळचा आकर्षण बिंदू आहे.

एमजी रोड
तुम्ही शिमला, मनाली आणि डलहौसी येथील अनेक ठिकाणांमधील एमजी रोडविषयी ऐकले असेल. हा रस्ता नेहमी सर्व ठिकाणांपेक्षा सर्वांत आकर्षणाचे ठिकाण आहे. गंगटोकला येणाऱ्यांसाठीही एमजी रोड प्रमुख डेस्टिनेशन ठरते. या रोडला गंगटोकचे हृदय म्हटले जाते. या रोडवरुन एकही वाहन धावत नाही. पायी ये-जा करावे लागते. जर तुमच्या ट्रिपमध्ये गंगटोकमधून खरेदी करु इच्छित असाल तर येथील मार्केट तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण आहे.  
 


ताशी व्ह्यू पाॅईंट
गंगटोकमध्ये असे अनेक व्ह्यू पाॅईंट्स आहेत जिथे पर्यटक वर्षानुवर्ष फिरणे आणि पाहण्यासाठी येतात. गंगटोकचा ताशी व्ह्यू पाॅईंट त्यापैकीच एक आहे. येथे पर्यटक माऊंट सनिलोच आणि माऊंट कांचनजुंगाचे मोहक दृश्यांचा आनंद घेतात. या व्ह्यू पाॅईंटवरुन बर्फाने झाकलेले पर्वत पाहणे हा एक स्वर्गीय आनंदच असतो. ताशी व्ह्यू पाॅईंट आपल्या सुंदर पर्वते आणि ढगांना वेढलेल्या ठिकाण असून जे बेस्ट ट्रॅव्हल डेस्टिनेशन मानले जाते. येथून तुम्ही हिमालयाची झलकही पाहू शकता. हे ठिकाण प्रेमयुगलांसाठी परफेक्ट मानले जाते.

सेव्हन सिस्टर्स वाॅटरफाॅल
तुम्हाला माहीत आहे का ईशान्य भारताला सप्तकन्या म्हणून ओळखले जाते. गंगटोकमध्ये एक धबधबा आहे. त्याला सेव्हन सिस्टर नाव आहे. हा धबधबा भारतात आपल्या सुंदर आणि निसर्गासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात तर अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. तर या स्थळा नक्कीच भेट द्या.त्सुक ल खंग मोनेस्ट्री
मठ एकेकाळी गंगटोकमध्येही राजेशाही होती. त्सुक ल खंग मोनेस्ट्री इमारत ही त्याच राजेशाहीचे साक्षीदार आहे. त्सुक ल खंग मोनेस्ट्री गंगटोकमधील राजवाडा आहे, जे पर्यटकांचे प्रमुख आकर्षणाचे ठिकाण आहे. यात एक मठही आहे. ते पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. हे मठ गंगटोकचे नववा राजा थेथुटोब नामग्यालच्या शासनकाळात बांधले होते. जे आजही आपल्या सौंदर्यासाठी पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image