esakal | पाचगणी हिल स्टेशन : उन्हाळ्यासह पावसाळ्याच्या दिवसांत भेट देण्याचे उत्तम ठिकाण
sakal

बोलून बातमी शोधा

Panchgani Hill Station

पाचगणी हिल स्टेशन : उन्हाळ्यासह पावसाळ्यातही भेट देण्याचे ठिकाण

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

16 व्या शतकापासून ते 18 व्या शतकापर्यंत पर्यटनासाठी अशी काही ठिकाणे सापडली जी उन्हाळ्याच्या दिवसांत राहण्यासाठी आणि भेट देण्याकरिता एक उत्तम ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाली. मध्ययुगीन काळात, ब्रिटीश साम्राज्याने रिसॉर्ट म्हणून अशा ठिकाणांचा वापर केला. परंतु, स्वातंत्र्यानंतर अशी ठिकाणे भारतीय आणि परदेशी लोकांसाठी एक उत्कृष्ट आणि आश्‍चर्यकारक स्थान म्हणून उदयास आल्या. यातील एक सुंदर ठिकाण म्हणजे 'पाचगणी हिल स्टेशन'. (tourism-news-panchgani-famous-places-to-visit-near-satara)

हे हिल स्टेशन मुंबईपासून थोड्या अंतरावर आहे. येथील नयनरम्य दृश्‍ये आणि सुंदर सरोवर फिरल्यानंतर तुम्ही नक्कीच हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंड विसरू शकाल. सह्याद्री पर्वताच्या पाच डोंगरांमुळे समुद्रसपाटीपासून 1300 मीटरपेक्षा जास्त उंची असलेले हे हिल स्टेशन पर्यटकांचे खास बनले आहे. येथे भेट देण्यापुर्वी येथील काही ठिकाणांबद्दल निश्‍चित तुम्ही जाणून घ्या जेथे उन्हाळ्याबरोबरच पावसाळ्यात ही तुम्ही जाऊ शकता.

हेही वाचा: जाणून घ्या, लाल किल्ल्याबाबतच्या माहीत नसलेल्या गाेष्टी

कास पठार

समुद्रसपाटीपासून सुमारे 1200 मीटर उंचीवर वसलेले हे सुंदर ठिकाण अनेक प्रकारची फुले आणि फुलपाखराच्या अनेक प्रकारांसाठी परिचित आहे. हे ठिकाण जगभरात कॅस पठार valley of flowers या नावानेही प्रसिद्ध आहे. या पठाराच्या सभोवताल असलेला सरोवर पर्यटकांसाठी हे ठिकाण आणखी विशेष बनवते. कास पठार देखील युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसामध्ये समाविष्ट आहे. आपणास वनस्पतींचे निसर्गरम्य सौंदर्य आणि विहंगम दृश्‍य पहायचे असल्यास नक्कीच येथे या. हे ठिकाण सातारा शहरपासून 21 किलोमीटर अंतरावर आहे.

हेही वाचा: देशातील 'या' उद्यानांत पहा रंगी-बिरंगी फुलपाखरु

भिलार वॉटर फॉल

कास पठारास भेट दिल्यानंतर भिलार वॉटर फॉल पॉईंट एक उत्तम ठिकाण आहे. हा धबधबा पावसाळ्यापासून ते हिवाळ्यादरम्यान बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करतो. या धबधब्याच्या सभोवताल हिरव्यागार आणि अनेक प्रकारची वनस्पती आणि फुले आपल्याला नक्कीच मोहित करतील. धबधब्यासह हे ठिकाण व्ह्यू पॉइंट म्हणून देखील प्रसिद्ध आहे. सूर्यास्त आणि सूर्योदय दरम्यान या ठिकाणी सभोवतालची स्थाने पाहिल्यानंतर एखाद्याला नक्कीच निसर्गाच्या हरवल्यासारखे वाटेल.

टेबल लॅंन्ड

आशियात यापेक्षा लांब पठार नाही. होय, आशियाच्या प्रदीर्घ पठारावर आनंद घेण्याची एक वेगळीच मजा आहे. एकरांवर पसरलेले हे ठिकाण सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या विहंगम दृश्‍यासाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी घोडेस्वारी, ट्रेकिंग, आर्केड खेळ यासारख्या बऱ्याच गाेष्टींत देखील गुंतू शकता. हे ठिकाण मुख्यतः सहलीसाठी सर्वांचे आवडते ठिकाण राहिले आहे.

राजपुरी लेणी

पुरातन काळापासून महाराष्ट्र व आजही अनेक लेणींसाठी प्रसिद्ध आहे. पाचगणी पासून काही अंतरावर असलेल्या राजपुरी लेण्या पांडवांशी संबंधित आहेत. वनवासात पांडवांनी काही दिवस या लेण्यांमध्ये आश्रय घेतला होता. या गुहेभोवती अनेक पवित्र तलाव आहेत, जे पर्यटकांसाठीही पवित्र आहेत. या तलावाचे पाणी सहजपणे बरेच रोग बरे करतात अशी आख्यायिका सांगितली जाते.

हेही वाचा: पर्यटकांनाे! महाबळेश्वर, पाचगणीला फिरायला निघालात? मग हे वाचाच

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा