Travel Tips : लहान मुलांसोबत प्रवास करताय? टेन्शन नॉट या खास टिप्स करा फॉलो

मुलांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता लागल्यास तुम्ही कुठेही कार थांबू शकता
Travel Tips
Travel Tipsesakal

Travel Tips : तुम्ही जर तुमच्या लहान मुलांसोबत एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी जात असाल, तर अशावेळी तुम्हाला मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत. ज्या तुम्हाला प्रवासादरम्यान मुलांची काळजी कशी घ्यावी? यासाठी मदत करतील.

Travel Tips
Republic day 2023 : पूर्वी फक्त 'राजा'च राजपथवरुन जायचा, जाणून घ्या अनोखा इतिहास

तुम्ही जेव्हा एखाद्या दूरवरच्या ठिकाणी फिरायला जायचं प्लॅनिंग करता, तेव्हा जर तुमच्यासोबत लहान मुले येणार असतील तर शक्यतो कारनेच प्रवास करा, बसने प्रवास करू नका. कारने प्रवास करत असल्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला तुमची कार कुठेही सहज थांबवता येते. मुलांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता लागल्यास तुम्ही कुठेही कार थांबू शकता.

Travel Tips
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये या गोष्टींवर बंदी, खिशात पेन सुद्धा नाही नेता येणार

बाळासोबत घराबाहेर पडण्यापूर्वी या गोष्टीं तुमच्या बॅगेत जरूर ठेवा :

प्रवासादरम्यान आपल्या लहान मुलांना कॉटनचेच कपडे घाला. कॉटनचे कपडे घालण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रवासादरम्यान बाळाला कंफर्टेबल फिल होतं. मुलं प्रवासात जेवढ फ्री फील करतील तेवढे ते आनंदी राहातील त्रास देणार नाहीत.

Travel Tips
Child Health : आईच्या अनुवांशिक थॉयरॉइडपासून बाळाचे संरक्षण कसे कराल ?

तुम्ही जर तुमच्या बाळासोबत प्रवास करत असाल तर अशा वेळी एखादी बेबी बॅग आवश्य सोबत ठेवा. ज्या बॅगमध्ये फक्त मुलांसाठी आवश्यक असणारे साहित्यच ठेवा. म्हणजे गरज पडल्यास लगेच तुम्हाला ते आपल्या बाळासाठी वापरता येईल.

Travel Tips
Travel Tips : बॉलीवूडचे भक्त आहात तर या खास डेस्टिनेशनला नक्की भेट द्या

शक्यतो उजेडाबरोबर प्रवास करा. रात्रीचा प्रवास करणं टाळा. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बाळाला अचानक कोणत्याही गोष्टीची गरज भासू शकते. रात्रीच्यावेळी त्या गोष्टी मिळतीलच याची खात्री नसते.

Travel Tips
Couple Travel : फेब्रुवारीत जोडीदारासोबत फिरण्यासाठी उत्तम आहेत ही ठिकाणे

तुम्ही जर तुमच्या कुटुंबीयांसोबत प्रवास करत आहात आणि तुमच्यामध्ये जर एखादे लहान मुलं असेल तर त्याची काळजी फक्त आईनेच घ्यावी असे काही नाही. तुम्ही देखील त्या मुलावर लक्ष ठेवा. प्रवासादरम्यान त्याची काळजी घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com