
Uttrakhand Tourism
esakal
परदेशी पाहुणे दरवर्षी आपल्या देशातील विविध ठिकाणांना भेटी देतात. हे परदेशी पाहुण म्हणजे मनुष्य रूपी नसून पक्षी आहेत. दरवर्षी हिवाळ्यातील काळात उंच हिमालयीन प्रदेशातून सुरखाब हे स्थलांतरित पक्षी अन्नाच्या शोधात उत्तराखंडमधील कोसी बॅरेजसह इतर जलाशयांमध्ये येतात.
यंदा हिमालयीन प्रदेशात लवकर बर्फवृष्टी झाल्याने सुरखाब पक्षी एक आठवडा आधीच रामनगरच्या कोसी बॅरेजमध्ये दिसू लागले आहेत. यामुळे वन विभाग आणि पक्षीप्रेमींमध्ये मोठा उत्साह आहे.