esakal | डोंबिवली- ठाण्याजवळची ५ वॉटरपार्क, एकदा तरी नक्की भेट द्या

बोलून बातमी शोधा

डोंबिवली- ठाण्याजवळची ५ वॉटरपार्क, एकदा तरी नक्की भेट द्या

आवर्जुन भेट देता येतील असे डोंबिवली- ठाण्याजवळचे वॉटरपार्क

डोंबिवली- ठाण्याजवळची ५ वॉटरपार्क, एकदा तरी नक्की भेट द्या
sakal_logo
By
शर्वरी जोशी

एप्रिल महिन्यात परिक्षा संपल्या की सगळ्या चिमुकल्यांच्या शाळांना सुट्टी लागते आणि मग प्रत्येक घरात रंगू लागतात ते पिकनिकचे प्लॅन. खरं तर मे महिना हा खास सुट्ट्यांचासाठीच असतो असं म्हणायला हरकत नाही. कारण, मुलांच्या शाळांना सुट्टी मिळाली की घरातील मोठी मंडळीदेखील ऑफिसमध्ये सुट्टी टाकून चार-पाच दिवसांसाठी मस्त फिरायला जातात. कोणी आपल्या गावी जातं, तर कोणी थंड हवेचं ठिकाण किंवा अन्य कोणत्याही राज्यात वगैरे फिरायला जातात. यात उन्हाळ्यात सगळ्यांची विशेष पसंती असते ते वॉटरपार्क, बीच किंवा थंड हवेचं ठिकाण. परंतु, दरवेळी आपल्या शहराबाहेर किंवा राज्याबाहेरच जाऊन कशाला पिकनिक केली पाहिजे? आपल्या मुंबई आणि मुंबईनजीक असलेल्या अनेक गावांमध्ये, शहरांमध्ये असे वॉटरपार्क, धबधबे आहेत, जेथे तुम्ही सुट्टीचा मनमुराद आनंद घेऊ शकता. म्हणूनच डोंबिवली-ठाण्यात असलेले वॉटरपार्क नेमकं कुठे आहेत ते पाहुयात.

१. वॉटर किंगडम -

लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांचं लोकप्रिय ठिकाण म्हणजे वॉटर किंगडम. येथे अनेकदा शाळांच्या सहलीदेखील येतात. आशिया खंडातील सर्वात मोठं थीम पार्क म्हणून याची खास ओळख आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर हे वॉटरपार्क अशून एस्सेल ग्रुपचा हा भाग आहे.  येथे विविध राईड्स असल्यामुळे तुम्हाला अॅडव्हेंचरचीदेखील मज्जा घेता येते.

कसं पोहोचाल - बोरीवलीवरुन जवळ. कारने पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन.

२.  शांती सागर वॉटर पार्क -

शांती सागर वॉटर पार्क येथे खासकरुन लोक फॅमेली पिकनिकसाठी येतात. विशेष म्हणजे खिशाला परवडणारे दर असल्यामुळे येथे कायमच लोकांची गर्दी असते. या वॉटरपार्क जवळच धबधबादेखील आहे. या वॉटर पार्कला पोहोचण्यासाठी त्यांची खास पिकअप सर्व्हिसदेखील आहे.

कसं पोहोचाल - अंबरनाथ स्टेशनवरुन जवळ.

३. टिकूजी नी वाडी वॉटर पार्क -

हे वॉटर पार्क मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. येथे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकतो अशा वॉटर राइड्सची सोय करण्यात आली आहे.

कसे पोहोचाल - ठाणे घोडबंदरवरुन जवळ 

हेही वाचा : धारावी ते कुलाबा कॉझवे ! खरेदीसाठी मुंबईतील ५ फेमस मार्केट

४. अडलॅब्स इमॅजिका वॉटर पार्क -

इमॅजिका वॉटर पार्क हा तुफान लोकप्रिय असलेल्या वॉटर पार्कपैकी एक आहे. येथे जवळपास १० ते १२ प्रकारच्या वॉटर राइड्स आहेत. हे वॉटर पार्क नवी मुंबईपासून जवळ आहे. 

५.  सूरज वॉटर पार्क -

 सूरज वॉटर पार्क ठाण्याजवळ आहे. ११ एकर विस्तीर्ण पसरलेल्या जागेत हा वॉटर पार्क उभा असून त्याला आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.

कसं पोहोचाल - घोडबंदर हायवेवरुन कारने किंवा ठाण्यावरुन रिक्षा वा बसने