Monsoon Tourism : धबधब्यांचं पाणी अचानक का वाढतं? वर्षा पर्यटनाला जाताना या गोष्टींचा नक्की विचार करा

Safe Waterfall : कोल्हापुरातील कोणते धबधबे आहेत सुरक्षित? अन् धबधब्यांवर जाण्याचा योग्य काळ कोणता?
Monsoon Tourism
Monsoon Tourismesakal

Monsoon Tourism :

पावसाळ्याची सुरूवात झाली की चार लोक वाहून गेले, दोन बुडाले, सेल्फीच्या नादात आयुष्य संपलं या अशा घटना घडू लागतात. सध्या तशाच घटनांनी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीलाच या आकडा धक्कादायक असाच आहे.

पावसाळा एन्जॉय करण्यासाठी भूशी डॅमवर गेलेली दोन कुटुंबे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. तर, काळमावाडी धरणावर दोन तरूण मुलं वाहून गेली. भूशी डॅमवर जी घटना घडली ती नैसर्गिक आपत्ती होती. कारण, धबधब्याचे पाणी नैसर्गिकरित्या वाढले होते. या घटना ताज्या आहेत.

वर्षा सहलीला जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळेच आपण धबधब्यांचे पाणी कसे वाढते, अन् धबधब्यांवर जायचे असेल तर काय काळजी घ्यावी याबद्दल बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर यांच्याकडून माहिती घेणार आहोत. (Waterfall Accident)

Monsoon Tourism
Kalu Waterfall Accident: काळू धबधब्यात हैद्राबादचा पर्यटक गेला वाहुन, शोध कार्य सुरू

धबधब्यांचे पाणी अचानक का वाढते?

डोंगर उतारावरील छोटे छोटे झरे मिळून मोठा प्रवाह तयार होतो. तो प्रवाह डोंगराच्या विशिष्ट कड्यावरून कोसळतो त्याला धबधबा म्हणता येईल. धबधब्यात असलेले पाणी हे प्रवाही असतं. त्याचा मुख्य प्रवाह हा डोंगर कपारीत असतो. डोंगरावर असलेल्या हिरवळीमुळे डोंगरांवर पाऊस जास्त पडतो. अन् तिकडे पाऊस पडल्याने धबधब्यांचे पाणी वाढते, असे सम्राट केरकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, धबधब्याचे पाणी वाढणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. कारण, एखाद्या धरणातील पाणी सोडल्याने नदीला पूर येतो तसे धबधब्याचे नसते. धबधब्याच्या पाण्यावर नियंत्रण मिळवणे शक्य नाही. डोंगरात पाऊस जास्त असेल तर सर्व झरे एकत्र येऊन पाण्याचा मोठा प्रवाह धबधब्यातून कोसळतो. (Waterfall)

Monsoon Tourism
Waterfall : हिरवेगार डोंगर, घाटमाथ्यावरचे धुके अन् अंगाला झोंबणारा वारा; गडांवर पर्यटकांची गर्दी

धबधब्याचे पाणी वाढण्याचा अंदाज येतो का?

अगदी काही क्षणांच्या अंतराने धबधब्याचे पाणी वाढते. त्यामुळे पाण्याचा अंदाज बांधता येत नाही. सुरूवातीला कमी असलेला प्रवाह अचानक दुपट्टीने वाढतो. आणि आपण धबधब्याखाली उभे राहील्यानंतर, किंवा पाण्यात असताना पाणी वाढत आहे असे लक्षात येत नाही.

धबधब्यांवर जाताना काय काळजी घ्यावी?

सम्राट सांगतात की, तुम्ही ज्या भागातील धबधब्यांवर जाणार आहात तिकडे पावसाचा अंदाज घेऊन मगच वर्षा पर्यटनाचे आयोजन करावे. कारण, तुम्ही जात असलेला धबधबा जमिनीपासून कमी उंचीवर असला तरी जिथे त्याचा प्रवाह आहे तो डोंगर उंच आहे. आणि उंच ठिकाणी अधिक पाऊस पडतो. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन मगच प्लॅनिंग करावे. (Bhushi Dam)

Monsoon Tourism
Mhwakada Waterfall : डोंगर कपारीतील धबधबे झाले प्रवाहित; 'हा' धबधबा पर्यटकांना करतोय आकर्षित

सोबत स्थानिक लोक घेऊन जावे

धबधब्यांवर जाताना कोणत्याही जानकार किंवा स्थानिक लोकांना सोबत घेऊन जाणे. ज्यामुळे कुठलेही संकट आले तर ते योग्य मार्ग दाखवू शकतील. तसेच, स्थानिक लोकांना धबधब्यांचे रस्ते, पाण्याचा अंदाज असतो त्यामुळे अशा लोकांना सोबत घेऊन जावे, असे सम्राट यांनी सांगितले.

सोबत या गोष्टी ठेवा

कोणावर कोणते संकट कधी कोसळेल सांगता येत नाही, त्यामुळे धबधबे, नदी सारख्या ठिकाणी पावसाळ्यात जाणार असाल तर सोबत रस्सी घेऊन जावी. जे लोक ट्रेकींग करतात असे लोक सोबत या छोट्या गोष्टी ठेवतात. त्याचा त्यांना फायदा होतो. त्यामुळे अशा गोष्टी सोबत ठेवाव्यात ज्याचा आपल्याला उपयोग होईल.

Monsoon Tourism
Ratnagiri Waterfalls : पर्यटकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! धबधब्यांबाबत पोलिस दलानं केलं 'हे' आवाहन

माहिती असलेल्या धबधब्यांवरच जावे

पावसाळ्याची सुरूवात असो वा शेवट तुम्हाला ज्या ठिकाणांची चांगली माहिती आहे, अशा ठिकाणीच तुम्ही जा. एखादे रिल पाहून, किंवा व्हिडिओ पाहून पावसाळी सहल ठरवू नका. जे लोक रिल बनवतात त्यांना त्या ठिकाणाच अंदाज असतो, पण जे नवखे ठिकाण असते ते आपल्याला संकटात पाडू शकते.

प्रशासनांच्या सुचनांचे पालन करावे

धबधब्यांवर जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे, तुम्ही सहल एन्जॉय करायला आला आहात. तर ती उत्साहाने एन्जॉय करा, नको तिथे अति उत्साह दाखवायला जाऊ नका. धबधबा, नदी, धरणांचे बॅक वॉटर अशा ठिकाणी फिरताना स्थानिक प्रशासनाच्या सुचनांचे पालक करावे. काही तरूण हुल्लडबाजी करतात अन् धाडस दाखवायला जातात. पण, ते त्यांच्या जीवावर बेतते. )

Monsoon Tourism
Top Waterfalls To Visit In India : येत्या पावसाळ्यात फिरण्यासाठीचे भारतातील काही धबधबे...

सेल्फी काढणे टाळावे

सध्या रिल्स, सेल्फी, व्हिडिओसाठी लोक वाट्टेल ते धाडस करत आहेत. पण, जेव्हा तुम्ही धबधबे अन् नदीवर पावसाळी सहल म्हणून जाता. तेव्हा पाणी कधी तुम्हाला त्याच्या कवेत घेईल हे सांगता येत नाही. त्यामुले सुरक्षित जागी उभे राहूनच सेल्फी घ्या, रिल्स करा.

तोरस्कर वाडीच्या ओढ्यात अडकलेले लोक

मागील वर्षी राधानगरीतील तोरस्करवाडीच्या धबधब्या पलिकडे अनेक लोक अडकले होते. कारण, हा धबधबा जंगलातून पार करावा लागतो. वाटेत एक ओढा लागतो तो पार करून पुढे चालत जावे लागते. जेव्हा काही पर्यटक ओढा पार करून गेले तेव्हा तिथे पाणी कमी होतं. पण, सायंकाळच्या दरम्यान पाणी वाढलं अन् त्यांना तिकडेच अडकावं लागलं. अशावेळी पुरेसे सामान, खाण्याचे पदार्थ सोबत घ्यावेत.

कोल्हापुर परिसरातले कोणते धबधबे सुरक्षित आहेत ?

तुम्ही काळजी घेतली तर प्रत्येक धबधबा सुरक्षित आहे. पण, राऊतवाडी, मानोली डॅम बॅक वॉटर, बर्की, आंबोली हे धबधबे तसे सुरक्षित आहेत. वर्षा पर्यटनासाठी हे धबधबे बेस्ट आहेत.

Monsoon Tourism
Ratnagiri Waterfalls : पर्यटकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! धबधब्यांबाबत पोलिस दलानं केलं 'हे' आवाहन

धबधब्यांवर जाण्याचा योग्य काळ कोणता?

जून- जुलै महिन्यात पाऊस रौद्र रूप धारण करत असतो. त्यामुळे या काळात पर्यटनाचा अजिबातच विचार करू नये. पण, लोक याच काळात जास्त बाहेर पडतात. तसे पाहिले तर, ऑगस्ट – सप्टेंबर या महिन्यात पावसाने थोडी विश्रांती घेतलेली असते.

या काळात पाऊस शांत असतो. त्यामुळे धबधब्यांतील पणी वाढणे, नदी पात्र भरणे अशी घटना घडत नाहीत, असेह राधानगरीतील बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com