
Sakal
जागतिक पर्यटन दिनच्या निमित्ताने 'पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन' या थीमखाली मराठवाड्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी वारसा, संस्कृती आणि निसर्गाचा आदर राखून काम करण्याची गरज आहे. ऐतिहासिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्याचा योग्य वापर करून रोजगारनिर्मिती आणि पर्यटनवृद्धी साधता येईल.
World Tourism Day 2025 sustainable tourism and heritage preservation: यंदा ‘पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन’ अशी जागतिक पर्यटन दिनाची थीम असून येणाऱ्या पिढ्यांसाठी पर्यटनाचे सकारात्मक बदल स्वीकारून काम होणार आहे. मराठवाडा पर्यटनाच्या संदर्भात भविष्यात मोठे बदल अपेक्षित आहेत. या भागाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाची समृद्ध परंपरा लाभलेली असली तरी त्याचा योग्य वापर आणि प्रचार आजवर पुरेशा प्रमाणात झालेला दिसत नाही. वारसा, संस्कृती, निसर्गाचा आदर राखून पर्यटनाला गती मिळावी, असे विचार या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.