esakal | महाराष्ट्राचे 'मिनी कास पठार' पर्यटकांसाठी सप्टेंबरमध्ये सुरु होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राचे 'मिनी कास पठार' पर्यटकांसाठी सप्टेंबरमध्ये सुरु होणार?

चांदोली राष्ट्रीय उद्यानातील झोळंबीचा सडा १५ ऑक्टोबरऐवजी एक महिना आधी १५ सप्टेंबरपासून खुला व्हावा

महाराष्ट्राचे 'मिनी कास पठार' पर्यटकांसाठी सप्टेंबरमध्ये सुरु होणार?

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा विचार करताना चांदोलीचे विस्तीर्ण जंगल, धरण, पठार, वनसंपदा, प्राणीसंपदा हेच मुख्य आकर्षण ठरते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील राखीव क्षेत्रात यापैकी मोठा भाग येत असल्याने विकासमार्गात काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. त्यात प्राधान्याने चांदोली राष्ट्रीय उद्यानातील झोळंबीचा सडा १५ ऑक्टोबरऐवजी एक महिना आधी १५ सप्टेंबरपासून खुला व्हावा, या मागणीसाठीचा रेटा आता वाढला आहे. त्यासाठी थेट केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

झोळंबीचा सडा म्हणजे ‘मिनी कास पठार’ अशी ओळख निर्माण होत आहे. त्याचा पर्यटकांना अधिकाधिक आनंद घेता यावा यासाठी सप्टेंबरच्या मध्यावरच तेथे जाण्यास परवानगी मिळावी, यासाठी निसर्गप्रेमींनी प्रयत्न सुरू केले आहेत. जेणेकरून चांदोली परिसरातील पर्यटन विकासाला चालना मिळावी, असा प्रयत्न आहे. पावसाळ्यात १५ जूनला हे ठिकाणी बंद होते आणि १५ ऑक्टोबरपासून पुन्हा प्रवेश सुरू होते.

हेही वाचा: चन्नईतील ही आहेत 'बेस्ट' कॅफे..तुम्हाला जायला नक्की आवडेल

येथे सप्टेंबर अखेरीस फुलांचा बहर येतो आणि तो एक ते दीड महिना टिकतो. तो सुरवातीपासूनच पर्यटकांसाठी खुला केला तर पाऊस, जंगल संपदा आणि मस्त सडा याचा आनंद घेता येईल, असे जाणकारांचे मत आहे. गुढे पाचगणीचे पठार, त्यावरील हिरवे गालिचे, पावसाळी हवा, धबधबे, पूर्ण भरलेले धरण या सगळ्या गोष्टी एकाचवेळी पहायच्या असतील तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर हेच पर्यटनासाठी उत्तम ठरतील, असा विचार पुढे आला आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे नियम कडक असल्याने त्यात कशी सवलत मिळते, याकडे लक्ष असेल.

हेही वाचा: चन्नईतील ही आहेत 'बेस्ट' कॅफे..तुम्हाला जायला नक्की आवडेल

रोप-वेचा प्रस्ताव द्यावा

चांदोलीच्या उद्यानातील जाणकारांशी ‘सकाळ’ने चर्चा केली. त्यांच्या मतानुसार, झोळंबीचा सडा आता १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू असतो, त्यामुळे महिनाभर लोकांना आनंद घेणे शक्य आहे. सप्टेंबर अखेरीचा पाऊस जास्त असल्याने अडचणी आहेत. या काळात जळू खूप असतात, पायी चालणे अवघड होते. शिवाय, त्यानंतरही पर्यटकांच्या सोयीसाठी आणि आकर्षण म्हणून या ठिकाणी झोळंबी सडा ते झोळंबी कुटी असो दोन किलोमीटर अंतराचा रोप-वे केल्यास फायदा होईल.

कसे जाल...

चांदोली राष्ट्रीय अभयारण्यालगतचे शेवटचे मोठे गाव मणदूर आहे. तेथून २० किलोमीटरवर झोळंबीचा सडा सुरू होतो. चार किलोमीटर अंतरावर वाहने उभी करून पायी जावे लागते. ही वाट भन्नाट आहे. निसर्गाचा मुक्त आनंद लुटण्याची संधीच. त्यामुळे चार किलोमीटर कधी पार होतात कळतही नाही. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गापासून गुगलवर मणदूर सर्च करा आणि तेथून मणदूर ते झोळंबी पठार...तुम्हाला नेव्हिगेशन दिसायला लागेल. एकच मुख्य रस्ता असल्याने तो चुकण्याची शक्यता नाही.

हेही वाचा: ट्रेकिंग : फिरण्यापेक्षा हटके अनुभव घेण्याचा करा प्रयत्न

चांदोलीची निसर्गसंपदा आणि प्राणीविश्‍व जपतानाच जिल्ह्यातील ही संपत्ती पर्यटनासाठी अधिक उपयोगात आणण्याबाबत आम्ही आग्रही आहोत. त्यामुळे झोळंबीचा सडा सप्टेंबरच्या मध्यावर खुला केला तर फुलोरा दीर्घकाळ पाहता येईल. १५ ऑक्टोबरनंतर पठार खुले होते, मात्र कमी काळात अधिक लोक आले तर अडचणी वाढतात. त्या काळात फुलोरा असतो, मात्र सप्टेंबरला खुले केले तर अधिकाधिक लोकांना त्याचा आनंद घेता येईल.

loading image
go to top