Trending in 2022 : 'या' पाच व्हिडिओने 2022 मध्ये घातला धिंगाणा; नेटकरीसुद्धा झिंगाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Trending in 2022

Trending in 2022 : 'या' पाच व्हिडिओने 2022 मध्ये घातला धिंगाणा; नेटकरीसुद्धा झिंगाट

आज वर्षाचा शेवटचा दिवस. सरतं वर्ष आपल्याला खूप काही देऊन गेलं. राज्यात राजकीय धुमाकूळ घालणाऱ्या घडामोडी घडल्या तर अनेक दिग्गजांना आपण गमावलं. तर चित्रपट आणि गाण्यामुळे आपलं हे वर्ष आनंदात गेलं. कोरोनानंतर या वर्षात पहिल्यांदाच आपल्याला चांगली उसंत मिळाली. या वर्षात अनेक बंद पडलेले उद्योग धंदे सुरू झाले. पण सोशल मीडियाने हे वर्ष आपल्यासाठी खास गेलं.

खरं तर सोशल मीडिया हे भारतातील तरूणांचे सर्वांत मोठे मनोरंजनाचे साधन बनले आहे. कोरोनानंतर अनेक तरूणांनी सोशल मीडिया क्रिएटर्स होण्याकडे कल दिला. सोशल मीडियामुळे अनेक नवे क्रिएटर्स जन्माला आले. यामधून तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाले. पण या वर्षात अनेक व्हिडिओने आपलं मनोरंजन केलं. ते कोणते व्हिडिओ आहेत आपल्याला आठवतात का? चला तर सविस्तर पाहूया...

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

काचा बदाम

बंगालमधील भुवन बड्याकर या व्यक्तीने शेंगा विकण्यासाठी हे गाणं म्हटलं होतं. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालं आणि गाजलं. तर त्यानंतर त्याच्या या व्हिडिओवर अनेकांनी गाणे तयार केले. या गाण्यावरील अनेक रील्सने तरूणाईला वेड लावलं होतं.

मेरा दिल ए पुकारे आजा...

पाकिस्तानातील आयेशा नावाच्या मुलीने लता मंगेशकर यांच्या 'मेरा दिल ए पुकारे' आजा या गाण्यावर एका कार्यक्रमात डान्स केला होता. हा डान्स भारतात प्रचंड व्हायरल झाला होता. तर त्या गाण्यावर अनेक इंस्टाग्राम रील्स व्हायरल झाले होते. या गाण्याचे अनेक भारतीय व्हर्जनचे रील्ससुद्धा व्हायरल झाले होते.

राता लंबीया...

शेरशाह या चित्रपटातील राता लंबीया या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तर नायजेरिएन जोडप्याने या गाण्यावर केलेला डान्स भारतात तुफान व्हायरल झाला होता. फेसबुकच्या एका कार्यक्रमातही हे गाणं वाजवण्यात आलं होतं.

हेही वाचा: Happy New Year 2023 : जगात पहिल्यांदा 'या' देशात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत

मै नही तो कौन बे?

अमरावती येथील सृष्टी तावडे या मुलीचा एक रॅप चांगलाच व्हायरल झाला होता. एका रिअॅलिटी शो मध्ये तिने हा रॅप गायला होता. तो रॅप महाराष्ट्रात गाजला होता. तर त्या रॅपमुळे मराठी मुलगी फेमस झाली होती.

काला चष्मा...

काला चष्मा या गाण्याने सोशळ मीडियामध्ये धुमाकूळ घातला होता. चार ते पाच जणांनी एकत्र येऊन या गाण्यावर रील्स बनवणे म्हणजे काही तरूणांसाठी एक प्रकारचं ठरलेलं काम झालं होतं.तर या गाण्याने चांगलंच मनोरंजन केलं आहे.