Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Family Conflict : आयटी क्षेत्रातील नोकरी गेल्यानंतर कुटुंबाकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा दावा एका २२ वर्षीय तरुणाने रेडिटवरील पोस्टमध्ये केला आहे. या तरुणाला आयटी क्षेत्रात नोकरी मिळाली होती आणि तो दरमहा ९५ हजार रुपये पगार मिळवत होता.
Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा
Updated on: 

एका २२ वर्षीय तरुणाची नोकरी गेल्यावर त्याच्या कुटुंबाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्याच्या पालकांनी तर त्याला जन्म देणे हीच चूक होती, असेही म्हटले. रेडिटवरील एका सविस्तर पोस्टमध्ये या तरुणाने सांगितले की, अवघ्या सहा महिन्यांतच त्याची आयटी (IT) क्षेत्रातील नोकरी गेल्यामुळे त्याचे आयुष्य विस्कळीत झाले. त्याने नमूद केले की, दुसरी नोकरी शोधण्यात मदत करण्याऐवजी त्याचे पालक त्याला टोमणे अपशब्द वापरू लागले, ज्यामुळे त्याचे दैनंदिन जीवन असह्य झाले. या कठीण प्रसंगाने त्याला शिकवले की कोणीही खऱ्या अर्थाने आपले नसते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com